वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत स्पर्धेतील 29 सामने पार पडले आहेत. यामध्ये काही संघ खूपच चांगली कामगिरी करत आहेत, तर काही संघ खूपच खराब कामगिरी करताना दिसत आहेत. खराब कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तान संघाचाही समावेश आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. या चारही सामन्यात पाकिस्तान सलग पराभूत झाला आहे. अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव मिळाला. अशात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम याचा शानदार व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो सध्याच्या काळातील आवडत्या फलंदाजांचे नाव सांगत आहे. यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे.
बाबरने कुणाची घेतली नावे?
स्टार स्पोर्ट्स इंडियाने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बाबर आझम (Babar Azam) याने त्याच्या आवडत्या फलंदाजांची नावे सांगितली आहेत. या व्हिडिओत बाबर म्हणाला की, “केन विलियम्सन, रोहित शर्मा आणि विराट कोहली माझे आवडते खेळाडू आहेत. कारण, हे क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज आहेत. त्यांना खेळताना पाहून खूप चांगले वाटते.”
.@babarazam258's batting idols are legends in their own right! 👏🏻
Look what the Pakistani skipper has to say about his favourite batters in @imVkohli, @imRo45 & Kane Williamson! 💪🏻#CWC23 #Cricket pic.twitter.com/HQuP1yiTv7
— Star Sports (@StarSportsIndia) October 29, 2023
पुढे बोलताना तो म्हणाला, “मला त्यांच्यातील जी गोष्ट सर्वात चांगली वाटते, ती कठीण काळातून संघाला बाहेर काढणे आहे. मुख्य बाब म्हणजे, वेगवेगळ्या परिस्थितीत जर गोलंदाजी चांगली होत असेल, तर कशाप्रकारे धावा करायच्या, हे त्यांना माहिती आहे. या सर्व गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. हे त्या गोष्टी कशाप्रकारे सांभाळतात, हे पाहण्याचा मी प्रयत्न करतो. यामुळेच हे सर्व सर्वोत्तम खेळाडू आहेत.”
खरं तर, बाबर आझम वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत धावा करताना दिसत आहे. त्याने मागील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 6 सामन्यात 34.50च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत. मात्र, त्याची चांगली फलंदाजीही पाकिस्तान संघाच्या पराभवाची मालिका खंडित करू शकली नाही. अशात त्यांना आशा आहे की, आगामी सामन्यात पाकिस्तान पुनरागमन करेल. (world cup 2023 babar azam revealed his favorite batsmen name kane williamson virat kohli rohit sharma see video)
हेही वाचा-
पुण्यात अफगाणिस्तानपुढे श्रीलंकेचे आव्हान, संभावित Playing XI ते खेळपट्टी, सर्व माहिती एकाच क्लिकवर
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद