वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 29 सामने पार पडले आहेत. त्यानंतर आता स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणार आहे. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. चला तर, या सामन्यापूर्वी खेळपट्टी, स्ट्रीमिंग आणि संघांची स्पर्धेतील कामगिरी पाहूयात…
अफगाणिस्तान आणि श्रीलंका (AFG vs SL) संघांनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील आपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले आहे, तर श्रीलंकेने इंग्लंडचा पराभव केला आहे. अशात उपांत्य सामन्यात दावेदारी ठोकण्यासाठी उभय संघात काट्याची टक्कर पाहायला मिळेल.
विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघात आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंका संघाने विजय मिळवला आहे. याव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्येही श्रीलंकेचं पारडं जड आहे. दोन्ही संघांमध्ये 11 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्येही 7 विजय श्रीलंकेने, तर 3 विजय अफगाणिस्तानने मिळवले आहेत. त्यातील 1 सामना अनिर्णित राहिला होता.
पुण्यातील खेळपट्टी
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) मैदानाच्या खेळपट्टीवर आतापर्यंत विश्वचषक 2023 स्पर्धेचा एकच सामना खेळला गेला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघात या मैदानावर सामना खेळला गेला होता. यावेळी सामन्यातील दोन्ही डावात 250हून अधिक धावांचा पाऊस पडला होता. पुण्याच्या खेळपट्टीवर नेहमीच धावांचा पाऊस पाहायला मिळतो. त्यामुळे या अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (Afghanistan vs Sri Lanka) सामन्यातही याची शक्यता आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. या सामन्याच्या नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवरही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. (icc world cup 2023 afg vs sl 30th match preview predicted eleven weather and live stream)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
श्रीलंका
कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुष्मंथ चमीरा, महीश थीक्षणा, कसून रजिता, दिलशान मधुशंका
अफगानिस्तान
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, इकराम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, अजमतुल्लाह उमरजाई, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
हेही वाचा-
टीम इंडियाच्या विजयावर आख्ख्या जगाने दिल्या शुभेच्छा, पण सचिन अन् ‘या’ दिग्गजाच्या पोस्टने वेधले लक्ष
भारताचा भीमपराक्रम! पराभव केला इंग्लंडचा, पण World Record तुटला न्यूझीलंडचा; बनला दुसराच संघ