आयसीसी विश्वचषक या वर्षीच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडू उपांत्य सामन्यात स्थान मिळवणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी करताना दिसत आहेत. यामध्ये बड्डे बॉय अर्थातच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावाचाही समावेश आहे. खरं तर, गांगुली शनिवारी (दि. 08 जुलै) 51वा वाढदिवस साजरा करतोय. अशात त्याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी केली आहे.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यानुसार, 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात एकूण चार संघ पोहोचतील. यामध्ये यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ उपांत्य सामन्यात पोहोचू शकतात. या तसेच, गांगुलीने चौथ्या संघाच्या रूपात न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांपैकी एक संघ सांगितला.
गांगुलीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचणाऱ्या माझी पहिली पसंत म्हणून भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आहेत. तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाला हलक्यात घेऊ शकत नाहीत. अशात मी 5 संघांना आपल्या उपांत्य सामन्याच्या शर्यतीत घेईल. यामध्ये पाकिस्तान संघाचाही समावेश करू इच्छितो.”
पुढे बोलताना गांगुली म्हणाला की, “पाकिस्तान संघाने क्वालिफाय केल्यामुळे भारतीय चाहत्यांना ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये उपांत्य सामना पाहायला मिळू शकतो.” खरं तर, जर पाकिस्तान संघाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली, तर त्यांचा सामना कोलकातामध्ये खेळला जाईल.
‘विश्वचषक भारतात होत असल्यामुळे खेळाडू दवाबात असू शकतात’
गांगुलीने यावेळी मोठे भाष्य करत म्हटले की, “भारतीय खेळाडूंवर या स्पर्धेत अधिक मानसिक दबाव पाहायला मिळणार नाही. कारण, सर्व खेळाडू खूपच मजबूत दिसत आहेत. मात्र, यावेळी स्पर्धा मायदेशात होत असल्यामुळे त्यांच्यावर प्रदर्शनाचा थोडा दबाव पाहायला मिळू शकतो.”
भारतीय संघाचे विश्वचषकातील सामने
विश्वचषकातील भारतीय संघाच्या सामन्यांना 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चेन्नई येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली येथे होईल. तसेच, तिसरा सामना 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद येथे, चौथा सामना 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध पुण्यात, पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध धरमशालेत, सहावा सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध लखनऊ येथे खेळला जाईल.
याव्यतिरिक्त सातवा सामना 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध मुंबईत पार पडेल. तसेच, आठवा सामना 5 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे भिडेल. याव्यतिरिक्त नववा सामना 11 नोव्हेंबर रोजी नेदरलँडविरुद्ध बंगळुरू येथे पार पडेल. (world cup 2023 former indian skipper and bcci president sourav ganguly picks his semi finalists)
महत्वाच्या बातम्या-
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा