भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. भारताने आतापर्यंत 6 सामने खेळले असून सहाच्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे. अखेरच्या दोन सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी याला सामील केले होते. यादरम्यान शमीने संधीचं सोनं केलं. त्याने दोनच सामन्यात 9 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसन याने संघाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शेन वॉटसन (Shane Watson) म्हणाला की, मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने ज्याप्रकारे मागील 2 सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे. हे पाहता म्हटले जाऊ शकते की, वेगवान गोलंदाजी फळीत त्याने मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची जागा घेतली आहे. वॉटसनने शमीच्या गोलंदाजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
मोहम्मद शमीने या विश्वचषकात आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 9 विकेट्स नावावर केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतले होते. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेण्याची डेरिंग केली होती. यावरून समजते की, तो किती चांगल्या लयीत आहे. तसेच, दुसरीकडे मोहम्मद सिराज याचे प्रदर्शन तितके चांगले राहिले नाही. अशात हार्दिक पंड्या याच्या पुनरागमनानंतर सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाऊ शकते.
‘मोहम्मद शमीचे प्रदर्शन सर्वोत्तम’
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोहम्मद शमी याच्याविषयी शेन वॉटसनने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “भारतीय संघापुढील समस्या ही आहे की, नेमकी कोणाची निवड करायची. ही एक खूपच चांगली समस्या आहे. यावरून समजते की, संघ किती चांगल्या फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक क्रिकेटपटू पुढे येऊन चांगले प्रदर्शन करत आहे. मला वाटते की, मोहम्मद शमीने सिराजची जागा घेतली आहे. कारण, मागील दोन सामन्यात त्याने खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचे प्रदर्शन खूपच जबरदस्त राहिले आहे.”
यापूर्वी माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनीही मोहम्मद शमी याची तुलना 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्याशी केली आहे. त्यांनी म्हटलेले की, “ज्याप्रकारे कपिल देव नेट्समध्ये सर्वाधिक गोलंदाजी करायचे, त्याचप्रकारे मोहम्मद शमीही करतो.”
शमीची स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेतील मोहम्मद शमी याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर 2 सामन्यात 8.44च्या सरासरीने आणि 4.47च्या इकॉनॉमीने 9 विकेट्स घेतल्या आहेत. (world cup 2023 mohammed shami has taken over mohammed siraj place says this cricketer)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियासाठी 526 विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची भविष्यवाणी; म्हणाला, भारत आणि ‘या’ संघात होणार वर्ल्डकप फायनल
बांगलादेशचा धुव्वा उडवत पाकिस्तानने Points Tableमध्ये घेतली गरुडझेप, पटकावला ‘हा’ क्रमांक