विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी कायम आहे आणि संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. भारतीय संघाच्या मागील दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमीने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चाहत्यांसह सहकारी खेळाडूही त्याचे कौतुक करत आहेत. दरम्यान, चाहत्याने शेअर केलेल्या पोस्टवर शमीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मागील सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने सात षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 22 धावा देत 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी, सामन्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शमीबद्दल अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.
एका चाहत्याने ट्विटरवर त्याचा एक फोटो शेअर केला होता ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘कृपया या फोटोला चांगले कॅप्शन द्या?’. सोमवारी (30 ऑक्टोबर) शमीने या ट्विटला रिट्विट केले आणि लिहिले, ‘संयमाचे फळ गोड असते.’
Sabar ka phal meetha ❤️😄😄 https://t.co/ine0knK9AL
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) October 30, 2023
विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला भारताच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. फलंदाजीचा क्रम आठव्या क्रमांकापर्यंत वाढवण्यासाठी संघ व्यवस्थापनाने पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला खेळवले होते, तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला पुढच्या तीन सामन्यात खेळवले होते. मात्र, ठाकूरला तीन सामन्यात दोनच विकेट्स घेता आल्या. त्याचबरोबर शमीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.
तो संपुर्ण स्पर्धेतही आपली लय कायम ठेवेल, अशी चाहत्यांना पूर्ण आशा आहे. विश्वचषक 2023 मधील भारताचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणार आहे. (Sabr Ka Phal Mitha Mohammad Shami captioned a fan post)
म्हत्वाच्या बातम्या
गौतम गंभीरचे रोहितविषयी मोठे विधान; म्हणाला, ‘तो कर्णधारच नाही…’