वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. अशातच या सामन्यांचे आयोजन केल्या जात असलेल्या स्टेडिअमबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी (दि. 20 जून) हरारे स्पोर्ट्स क्लबला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र, आगीच्या घटनेवर अधिकाऱ्यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, धमाक्यानंतरही मैदानाचे कोणतेच नुकसान झाले नाहीये. आयसीसीचे सुरक्षा पथक आणि झिम्बाब्वे क्रिकेटने केलेल्या निरीक्षणाने स्पर्धेसाठी या मैदानाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
दूर पसरल्या आगीच्या ज्वाळा
मंगळवारी झिम्बाब्वे विरुद्ध नेदरलँड (Zimbabwe vs Netherlands) संघात वनडे विश्वचषक क्वालिफायर 2023 (ICC Cricket World Cup Qualifiers 2023)मधील पाचवा सामना पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्याच्या 6 तासानंतर मैदानाच्या दक्षिण भागाला आग लागल्याचे दिसले. वृत्तांनुसार, मुख्यत: कॅसल कॉर्नरवर आग लागली. मात्र, आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. एका व्हिडिओत दिसते की, आगीच्या ज्वाळा जमिनीच्या बाहेर झाडांपर्यंत पोहोचल्या होत्या. तसेच, ज्वाळा स्टँडच्या आसपास जातात. हाती आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत स्टँडचे नुकसान होण्यापूर्वीच आग विझवली.
मैदानाच्या वापरासाठी हिरवा कंदील
बुधवारी (दि. 21 जून) मैदानाचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) मैदान प्रेक्षकांसाठी सुरक्षित असल्याचे सांगत हिरवा कंदील दिला आहे. कोव्हिड-19 संपल्यानंतर या स्टेडिअमवर अनेक सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. मागील रविवारी (दि. 21 जून) नेपाळविरुद्ध झिम्बाब्वे सामन्यालाही प्रेक्षकांची गर्दी होती.
Fire guts Harare Sports Club
A section at the Harare Sports Club went up in flames today. The Harare Sports Club is currently hosting the ICC World Cup cricket qualifiers. pic.twitter.com/3bDPlz74KC
— #FokusZW (@Fokus_zw) June 20, 2023
मंगळवारी नेदरलँडविरुद्ध स्टेडिअम खचाखच भरले होते. शनिवारी (दि. 24 जून) झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज होणाऱ्या सामन्यातही प्रेक्षकांची गर्दी असण्याची आशा व्यक्त केली जात आहे. एकूणच आणखी 3 साखळी सामने, चार सुपर सहा सामने आणि अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात भिडणारे दोन संघ यावर्षीच्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठीही पात्र ठरतील. (world cup 2023 qualifier harare sports club fire icc inspects and clears ground for further use read here)
महत्वाच्या बातम्या-
TNPLमध्ये अश्विनच्या संघाचा अवघ्या 1 धावेने विजय, वरुण चक्रवर्तीची घातक गोलंदाजी ठरली फायद्याची
‘किंग’विरुद्ध खेळण्यासाठी अमेरिकेचा ‘हा’ युवा खेळाडू आतुर; म्हणाला, ‘माझे सर्वात मोठे लक्ष्य विराट…’