मुंबई । 2022 पर्यंत महिला वनडे विश्वचषक स्थगित करण्यात आला. त्यावेळी भारताची मुख्य वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी 39 वर्षांची असेल. पण तरीही महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेल्या गोस्वामीने या स्पर्धेत भाग घेण्याची आशा तिने सोडली नाही. सातत्याने कामगिरी करून ती संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेन असं तिचं म्हणणं आहे. झूलन आणि भारतीय संघाची कर्णधार मिताली राज यासारख्या महिला खेळाडूंना न्यूझीलंडमध्ये 2021 चा विश्वचषक होईल असे अपेक्षित होते.
परंतु कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2021 ला होणारा महिला वनडे विश्वचषक 2022 पर्यंत पुढे ढकलला. आयसीसीच्या या घोषणेनंतर मितालीने ट्विट केले की, “12 महिन्यांच्या स्थगितीमुळे त्याच्या संघाला तयारीसाठी भरपूर वेळ मिळेल, कारण कोविड १९ साथीमुळे आमच्या योजनांवर आणि ध्येयावर गंभीर परिणाम केला. प्रथम विश्वचषक जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.”
There’s always a positive to take out of any situation , in this case too , I say more time for planning and preparations . Same vision , same goal #WorldCup2022 https://t.co/Cuq9kbQuA4
— Mithali Raj (@M_Raj03) August 7, 2020
झूलनही मितालीप्रमाणे 37 वर्षांची आहे. तिला 18 महिन्यांनंतर न्यूझीलंडमध्येही खेळायचे आहे, परंतु तिचे म्हणणे आहे की विश्वचषकातील सहभाग हा तिच्या फिटनेस व तिच्या कामगिरीवर निश्चित होईल. झुलनने पीटीआयला सांगितले की, ‘आमच्याकडे तयारीसाठी बराच वेळ आहे, साधारण 18 महिने, पण दुसरीकडे जर हे पुढच्या वर्षी असते तर ते बरं झालं असतं कारण मी त्यावर बरीच काळ लक्ष केंद्रित केले होते.’
ती म्हणाली, ”आता तुम्हाला याबद्दल आणखी विचार करण्याची गरज आहे. आम्ही गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोणतेही क्रिकेट खेळलेलो नाही आणि माझ्यासारखे खेळाडू जे केवळ वनडे सामने खेळतात ते नोव्हेंबर (2019) मध्ये शेवटवची स्पर्धा खेळले होते.”
2022 च्या विश्वचषकामध्ये ती खेळताना दिसेल का? असे विचारल्यावर ती म्हणाली की, ”भारताकडून खेळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. होय, 2022 हे लक्ष्य अद्याप कायम आहे, परंतु आपण या प्रक्रियेचा एक भाग झालो पाहिजे आणि सामने खेळून सतत कामगिरी केली पाहिजे. तरच आपण विश्वचषकाबद्दल विचार करू शकता कारण अजून बराच वेळ शिल्लक आहे आणि तो जवळ नाही. ‘
महत्त्वाच्या बातम्या –
‘सचिनला त्रिफळाचीत करणारा माझा तो चेंडू वॉर्नपेक्षाही भारी,’ पाहा कोण म्हणतंय…
वीरेंद्र सेहवागच्या ‘या’ शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ
-विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा
ट्रेंडिंग लेख –
५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर
‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई