---Advertisement---

रोहित-कोहली नव्हे तर ‘हे’ ३ खेळाडू ठरू शकतात कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये सामनावीर पुरस्काराचे मानकरी

On: बुधवार, मे 12, 2021 10:48 AM
---Advertisement---

संपूर्ण क्रिकेटविश्व जून महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात बलाढ्य भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ आमने सामने असणार आहेत. या स्पर्धेसाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी ७ मे रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे नक्की आहे. या दोन्ही संघात असे काही खेळाडू आहेत, जे या मोठ्या सामन्यात सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरू शकतात. चला तर पाहूया…

१) केन विलियमसन : न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन हा सध्या क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. या सामन्यात त्याच्यावर कर्णधारपदाचा दबाव असेल. तसेच संघासाठी मोठ्या धावा करण्याची जबाबदारी देखील असणार आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ८३ सामने खेळले आहेत. यात त्याला ५४.३१ च्या सरासरीने ७११५ धावा केल्या आहेत. त्याने न्यूझीलंड संघाच्या अनेक विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

तसेच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यातही केन विलियमसनने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या सामन्यात केन विलियमसनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच केन विलियमसन सामनावीर पुरस्कार पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार असणार आहे.

२) जसप्रीत बुमराह : भारतीय संघाचा वेगवान जसप्रीत बुमराह याला क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांध्ये गणले जाते. भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर बुमराहने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. बुमराह या सामन्यात आपल्या यॉर्कर आणि स्लोवर चेंडूने न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो.

त्याने आतापर्यंत एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ८३ गडी बाद करण्यात यश आले आहे. हा सामना इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना भरपूर मदत मिळेल. त्यामुळे बुमराह देखील या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावू शकतो.

३) ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंड संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य स्तंभ आहे. त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट म्हणजे तो चेंडूला दोन्ही दिशेने स्विंग करू शकतो. भारतीय फलंदाज हवेत फिरणाऱ्या चेंडूवर अडचणीत येतात. त्यामुळे सर्वांचेच लक्ष ट्रेंट बोल्टच्या कामगिरीवर असणार आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७१ सामने खेळले आहेत. यात त्याने २८१ गडी बाद केले आहेत. त्यामुळे ट्रेंट बोल्ट देखील या सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो,’ अभिनेत्रीसोबत आपले नाव जोडणाऱ्यांना ऋतुराजचा मराठीत टोमणा!

‘हे’ २ धाकड अष्टपैलू एकत्र खेळले तर भारत नक्कीच कसोटी चॅम्पियनशीप जिंकेल; माजी खेळाडूचे भाष्य

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले पारस महांब्रे आहेत तरी कोण? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---