बर्मिंगहॅम। आज(२जूलै) २०१९ विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात ४० वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुलने १८० धावांची सलामी भागीदारी रचली आहे. यामध्ये रोहितने शतकी खेळी केली आहे. त्याने ९० चेंडूत त्याचे हे या विश्वचषकातील चौथे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर रोहितचे हे विश्वचषकातील एकूण पाचवे शतक आहे.
रोहित आज ९२ चेंडूत १०४ धावा करुन बाद झाला. या शतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याला सौम्य सरकारने बाद केले. रोहितने या शतकाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
रोहितने केलेले हे खास विक्रम –
#विश्वचषक २०१९मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
५४४- रोहित शर्मा, सामने- ७
५१६- डेव्हिड वाॅर्नर, सामने- ८
५०४- एराॅन फिंच, सामने- ८
४७६- शाकिब अल हसन, सामने- ६
४७६- जो रुट, सामने- ८
#एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
६७३- सचिन तेंडूलकर, २००३
६५९- मेथ्यू हेडन, २००७
५४८- माहेला जयवर्धने, २००७
५४७- मार्टीन गप्टील, २०१५
५४४- रोहित शर्मा, २०१९
५४१- कुमार संगकारा, २०१५
५३९- रिकी पाॅटींग, २००७
#वनडेत कोणत्याही एकाच स्पर्धेत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू –
४- कुमार संगकारा, २०१५ विश्वचषक
४- रोहित शर्मा, २०१९ विश्वचषक
#विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे खेळाडू –
६- सचिन तेंडूलकर, सामने- ४४
५- रिकी पाॅटींग, सामने- ४२
५- कुमार संगकारा, सामने- ३५
५- रोहित शर्मा, सामने- १५
#विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
६- सचिन तेंडूलकर
५- रोहित शर्मा
४- सौरव गांगुली
#विश्वचषकात कसोटी खेळणाऱ्या संघांविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
५- रोहित शर्मा
४- रिकी पाॅटींग
३- सचिन तेंडूलकर
३- एबी डिव्हीलियर्स
#आयसीसीच्या स्पर्धांत सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
७- सौरव गांगुली, डाव- ३२
७- सचिन तेंडूलकर, डाव- ५८
६- शिखर धवन, डाव- २०
६- रोहित शर्मा, डाव- २५
६- रिकी पाॅटींग, डाव- ६०
६- कुमार संगकारा, डाव- ५६
#२०१९मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
११३८- एराॅन फिंच, डाव- २१
११००- रोहित शर्मा, डाव- २०
१०६७- उस्मान ख्वाजा, डाव- २१
१००२- विराट कोहली, डाव- १८*
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू–
३६४ – रोहित शर्मा*
३५८ – एमएस धोनी
२६३ – सचिन तेंडुलकर
२५१ – युवराज सिंग
२४७ – सौरव गांगुली
#वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –
२३० षटकार – रोहित शर्मा
२२८ षटकार – एमएस धोनी
१९५ षटकार – सचिन तेंडुलकर
१९० षटकार – सौरव गांगुली
१५५ षटकार – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
–आता रोहित शर्माचे नाव सचिन तेंडुलकर बरोबर आदराने घेतले जाणार
–‘हिटमॅन’ रोहित शर्माने एमएस धोनीच्या या मोठ्या विक्रमाला टाकले मागे
–२००७ला विश्वचषकात संधी मिळालेला टीम इंडियाचा शिलेदार खेळतोय १२ वर्षांनी विश्वचषकात






