राजस्थान क्रिकेट असोसिएशनद्वारे (आरसीए) जयपूरमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम तयार होणार आहे. त्याचे डिझाईन देखील तयार झाले आहे. याबद्दलची माहिती आरसीएचे सचिन महेंद्र शर्मा यांनी दिली आहे.
या स्टेडियमसाठी 350 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 75 हजारांएवढी असेल. या स्टेडियमची उभारणी 2 टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार प्रेक्षक क्षमता असेल. तर दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता वाढवून 75 हजार इतकी करण्यात येईल.
हे स्टेडियम 100 एकर जागेत तयार होणार आहे. ही जमीन चौंप गावात आहे. या स्टेडियममध्ये बहुउद्देशीय प्रशिक्षण आकादमी, इंडोर गेम्सची सुविधा, क्लब हाऊस, 4 हजार कारसाठी पार्किंग, पब्लिक ट्रांन्सपोर्टसाठी खास सुविधा करण्यात येणार आहे. तसेच स्टेडियममध्ये 2 रेस्टोरंटची सुविधा देखील करण्यात येणार आहे. तसेच या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे 2 मैदाने असतील. तिथे 30 प्रॅक्टिसनेट असतील. या व्यतिरिक्त 250 सीटांची प्रेस कॉन्फरन्स रुम वेगळी असेल.
अहमदाबाद येथील मोटेरा क्रिकेट स्टेडियमनंतरचे भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार इतकी आहे. मोटेरा पाठोपाठ जगात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियम दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम आहे. मेलबर्न स्टेडियमची 1 लाख प्रेक्षक क्षमता आहे. या नंतर आता जगातील सर्वोत मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या यादीत जयपूरच्या स्टेडियमचा क्रमांक लागू शकतो.
जयपूर येथे तयार होणाऱ्या या स्टेडियमसाठी आरसीएने बीसीसीआयला 100 कोटी रुपयांच्या अनुदानासाठी पत्रही लिहिले आहे. बीसीसीआयकडे 90 कोटींची थकबाकी आहे. तसेच 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाईल. तर 60 कोटी रुपये स्टेडियममधील कॉर्पोरेट बॉक्स विकून मिळवले जातील.
ट्रेंडिंग घडामोडी –
मॅन ऑफ द सिरीजमध्ये मिळालेली कार देखील क्रिकेट बोर्डाने त्याला लावली होती विकायला
आजीवन बंदी घालण्यात आलेल्या क्रिकेटरने श्रीशांत प्रकरणात बीसीसीआयला लिहीले पत्र, वाचा काय आहे प्रकरण
कुलदीपचा धोनीबद्दल धक्कादायक खुलासा, धोनीमुळे खराब झाली…