इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातही कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. ‘प्ले ऑफ’ पर्यंत पोहोचलेला बेंगलोर संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यातुन मात्र बाद झाला. या पराभवानंतर समीक्षकांनी विराटच्या नेतृत्व गुणाला लक्ष्य केले आहे. यावर माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यांनी समीक्षकांनाच उलटप्रश्न विचारले आहेत.
आकाश चोप्रा फेसबूक व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाला, “बेंगलोरचा संघ 2020 च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला होता. कदाचित त्यांचा संघ चांगला खेळू शकला नसला तरी प्ले ऑफ पर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले होते. हैदराबाद विरोधात ते हरले असतील पण एकूणच त्यांनी उत्तम कामगिरी बजावली.”
तो पुढे समीक्षकांना टोला लगावताना म्हणाला, “गेल्या 8 वर्षात कोहली बेंगलोरचा कर्णधार आहे तरीही त्याची टीम हे विजेतेपद अजूनही जिंकू शकलेली नाही. मग अशा परिस्थितीत त्याला काढून टाकले जावे, त्यानंतर त्याला भारतीय टी -20 संघाच्या कर्णधारपदावरुनही काढून टाकले पाहिजे.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “माझ्याकडून सर्व समीक्षकांना एक छोटासा प्रश्न आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा मी चाहता नाही, परंतु मला माझे विचार अगदी निष्पक्षपणे मांडायचे आहेत. कोहली व्यतिरिक्त आपण इतर कोणाला संघाचा कर्णधार बनविला असता तर त्यानी अंतिम सामना जिंकला असता का ? बेंगलोरचा संघ आणखी पुढे पोहोचला असता ? आता, जर हा संघ चांगला असेल आणि कर्णधारामुळे मागे जात असेल तर, तर त्याला नक्कीच काढून टाकायला हवे. त्यात काही समस्या नाही.”
“परंतु जेव्हा आपण त्याला काढून टाकण्याविषयी चर्चा करता तेव्हा हेही सांगा की तो आपला कर्णधार आहे किंवा कर्णधारपदाचा उमेदवार आहे आणि जर बेंगलोरचाच संघ दुसर्या एखाद्याला दिले तर ते काय विजयी होतील?” असा प्रश्नही चोप्राने विचारला आहे.
तो पुढे म्हणाला, “मी सहमत आहे की कर्णधार चांगला असल्याने यात काहीसा फरक पडतो, परंतु जर असे म्हणायचे असेल की संघ खराब कामगिरी करतो, तो कर्णधारामुळे करतो तर ते चुकीचे आहे. आपण असे करत असल्यास हे ही मान्य करा की त्याच्यामुळे संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आणि हे देखील सांगणे चुकीचे ठरेल की कोहलीच्या नेतृत्त्वामुळेच संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आणि कोहली तिथे नसता तर तो खालीच राहिला असता.”
“मला हे मान्य आहे की कोहलीच्या नेतृत्वात संघ खराब कामगिरी करत आहे. पण तो इतकाही वाईट कर्णधार नाही जितका लोक त्याला म्हणत आहेत. कारण जर तो इतका वाईट कर्णधार असता तर तो भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवू शकला नसता,” असेही चोप्राने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
ग्रेट कार्ड्स! केएल राहुलने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर अथिया शेट्टीने दिली प्रतिक्रिया
“आयपीएलमध्ये पूर्ण पैसे मिळावेत म्हणून खेळाडू लपवून ठेवतात दुखापती”
अजीत आगरकर होणार बीसीसीआयच्या निवड समितीचा प्रमुख? पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…