---Advertisement---

WPL 2023: सलग पाचव्या सामन्यात आरसीबी पराभूत! रोमांचक सामन्यात दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये सोमवारी (13 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ सुरू ठेवत, दिल्लीने सहा विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव आहे. तसेच, त्यांच्या क्वालिफायरमध्ये पोहोचण्याच्या आशा देखील जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

 

डी. वाय. पाटील स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीसाठी या सामन्याची सुरुवात देखील तितकीशी चांगली झाली नाही. कापने पहिले षटक निर्धाव टाकले. कर्णधार स्मृती मंधाना केवळ 8 धावांवर तंबूत परतली. अनुभवी सोफी डिवाईन व हिदर नाईटने अनुक्रमे 21 व 11 धावा केल्या. त्यानंतर एलिस पेरी व रिचा घोष आक्रमक फलंदाजी करत दिल्लीवर दबाव टाकला. शिखाने 16 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी करणाऱ्या रिचाला तंबूत पाठवले. पेरीने अखेरपर्यंत नाबाद राहत 52 चेंडूंवर 67 धावांची खेळी केली. दिल्लीसाठी शिखा पांडेने सर्वाधिक 3 बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या 151 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला दुसऱ्याच चेंडूवर शफाली वर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या एलिस कॅप्सीने आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. तिने 24 चेंडूवर 38 धावांची तुफानी खेळी केली. लॅनिंगने 15 धावांचे योगदान दिले. स्पर्धेत आत्तापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने 38 धावा करत दिल्लीला सामन्यात कायम ठेवले. अष्टपैलू मरिझान कापने एका बाजूने संघर्ष करत होती. जेस जॉन्सनने फलंदाजीला आल्यावर आक्रमक सुरुवात करत दिल्लीला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज असताना जॉन्सनने एक षटकार व चौकार मारत संघाला चौथा विजय मिळवून दिला.

(WPL 2023 Delhi Capitals Beat RCB By 6 Wickets Jess Johnson And Marizanne Kapp Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---