महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेथ मूनी स्पर्धेतून बाहेर झाली आहे. मूनी पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना एक धाव घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाली होती. तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे आता तिला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. महत्त्वाचं म्हणजे, 40 लाख मूळ किंमत असलेल्या मूनीला गुजरातने 2 कोटीत संघात घेतले होते. तिच्या जागी गुजरात संघाचे कर्णधारपद भारतीय संघाची खेळाडू असलेल्या स्नेह राणा हिच्याकडे आले आहे. याव्यतिरिक्त मूनीच्या जागी संघात स्टार खेळाडू लॉरा वोल्वार्ड हिला सामील केले आहे. याची माहिती गुजरात संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
खरं तर, लॉरा वोल्वार्ड (Laura Wolvaardt) ही सध्या पीसीबी महिला लीगच्या (PCB Womens League) उद्घाटन सामन्यात भाग घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये होती. मात्र, तिला सुपर वुमेन संघाने मुक्त केले आहे. तिची जागा सुने लूस हिने घेतली. अशात आता लॉरी लवकरच गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाचा भाग बनत भारतामध्ये खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, लॉरा लिलावादरम्यान अनसोल्ड राहिली होती. मात्र, आता कर्णधाराच्या जागी तिला एन्ट्री मिळाली आहे.
🚨 Beth Mooney has been ruled out of the inaugural season of the Women’s Premier League due to an injury. Laura Wolvaardt has been drafted in as her replacement.#WPL2023 #GujaratGiants #AdaniSportsline #Adani
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 9, 2023
कोण आहे लॉरा वोल्वार्ड
लॉरा वोल्वार्ड ही दक्षिण आफ्रिका महिला संघाची दमदार खेळाडू आहे. तिने 53 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात तिने 1079 धावा केल्या आहेत. तिची फलंदाजी सरासरी 30.8 इतकी आहे. तसेच, 109.1 इतका स्ट्राईक रेट आहे. तिने 7 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान तिची सर्वोत्तम धावसंख्या ही 66 इतकी राहिली आहे. तिने तिच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट कारकीर्दीतील 53 सामन्यात 119 चौकार आणि 15 षटकारांचाही पाऊस पाडला आहे.
विश्वचषकात केली होती कमाल
लॉराने तिच्या संघाला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ती सलामीला फलंदाजी करते. टी20 विश्वचषकातील शानदार कामगिरीमुळे आयसीसीने तिला फेब्रुवारी 2023 साठी ‘आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ’ या पुरस्काराने नामांकित केले होते. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लॉराने 61 धावांची वादळी खेळी केली होती. मात्र, तिला संघाला विजयी करता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी पराभूत करत विश्वचषक उंचावला होता. (wpl 2023 laura wolvaardt join gujarat giants replacement beth mooney this indian cricketer becames captain of ggt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या
चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण