---Advertisement---

WPL 2024 : RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

---Advertisement---

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने सामने येणार आहेत. तर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात नेत्रदीपक विजय नोंदवल्यानंतर मंधानाचे लक्ष दुसऱ्या स्थानावर असणार आहे.

याबरोबरच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आत्तापर्यंत तीन  सामने झाले आहेत. यामध्ये बंगळुरूचा संघ दिल्लीला पराभूत करण्यात अपयशी ठरला आहे. म्हणजे तीनपैकी तीन सामने दिल्लीच्या संघाने जिंकले आहेत.

याआधी दिल्लीने शेवटचा सामना यूपी वॉरियर्सविरुद्ध खेळला होता. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने 20 षटकात 138 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना दिल्लीची फलंदाजी ढासळली. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने 46 चेंडूत 60 धावांची कर्णधार खेळी खेळली, पण तिच्याशिवाय इतर फलंदाजांना 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे यूपी वॉरियर्सने रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा 1 धावाने पराभव केला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कॅप्टन), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकिपर), दिशा कासट, जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकिपर), शिखा पांडे, राधा यादव, तितास साधू.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---