---Advertisement---

WPL 2026: शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, चार संघ मैदानात उतरणार

On: शनिवार, जानेवारी 10, 2026 8:06 AM
---Advertisement---

वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला शेवटच्या चेंडूवर नमवत थरारक विजय मिळवला आणि आपल्या मोहिमेची विजयी सलामी दिली. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला हंगामाची सुरुवात अपयशाने करावी लागली आहे.

या सामन्यानंतर आता चाहत्यांचं लक्ष शनिवारी 10 जानेवारीकडे लागलं आहे. कारण आज दिवशी WPL 2026 मधील पहिला डबल हेडर खेळवला जाणार आहे. एका दिवसात दोन सामने असल्याने क्रिकेट रसिकांना दुहेरी आनंद मिळणार आहे.

गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स – पहिल्या विजयासाठी लढत

डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांचा हा या हंगामातील पहिलाच सामना असल्याने विजयी सुरुवात करण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल. गुजरात जायंट्सचं नेतृत्व अनुभवी ऑलराउंडर एश्ले गार्डनरकडे आहे, तर यूपी वॉरियर्सची धुरा मेग लेनिंगकडे सोपवण्यात आली आहे.

हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक होईल. पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

दीप्ती शर्मावर असणार विशेष नजर

यूपी वॉरियर्सकडून ऑलराउंडर दीप्ती शर्माकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये असलेली दीप्ती गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही प्रभाव टाकू शकते. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिचं नाव अग्रस्थानी असून, त्यामुळे तिच्यावर दुहेरी जबाबदारी असणार आहे.

दुसऱ्या सामन्यात मुंबईसमोर दिल्लीचं कडवं आव्हान

डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. हा दिल्लीचा हंगामातील पहिला सामना असेल, तर मुंबईचा सलग दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यातील पराभव विसरून मुंबईला पुनरागमन करण्याचं आव्हान असेल, तर दिल्ली विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

दिल्ली कॅपिटल्ससची जेमीमाह रोड्रिग्सचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असेल. तर हरमनप्रीत कौर मुंबईला विजयाच्या मार्गावर आणू शकते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे. दोन्ही सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. तसेच मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओहॉटस्टारवर थेट सामना पाहता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---