मुंबई येथे सुरू असलेल्या पहिल्या वुमेन्स प्रिमियर लीगमधील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. पहिला सामन्याप्रमाणेच एकतर्फी झालेल्या या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा तब्बल 60 धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
A 𝗥𝗢𝗔𝗥-ing victory to start our #TATAWPL campaign 🔥💪#YehHaiNayiDilli #CapitalsUniverse #RCBvDC pic.twitter.com/KoG0wDOWK5
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 5, 2023
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. दिल्लीच्या फलंदाजांनी आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. संघाची कर्णधार मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी दिल्लीसाठी सलामीला येताना अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. दोघींनी आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 162 धावा कुटल्या. लॅनिंगने 43 चेंडूवर 14 चौकार लगावत 72 धावा केल्या. तर, दुसऱ्या बाजूने शफालीने आपल्या नावाला साजेसा खेळ दाखवला. तिने अवघ्या 45 चेंडूवर 84 धावा फटकावल्या. यात 10 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. त्या दोघींना एकाच षटकात नाईटने बाद केले. त्यानंतर आलेल्या मरिझान कापने 17 चेंडूवर 39 तर जेमिमा रॉड्रिग्जने 22 धावांचे योगदान दिले. यासह दिल्लीने 2 बाद 223 धावा केल्या.
या भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मंधाना व सोफी डिवाईन यांनी आरसीबीला 4 षटकात 40 धावांची सलामी दिली. स्मृती 35 धावा करून बाद झाल्यानंतर मध्य फळेतील इतर फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. हिदर नाईटने 21 चेंडूवर 34 व मेगन शूटने 30 धावा करत एकतर्फी संघर्ष केला. मात्र, संघाला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीसाठी अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी तारा नॉरिस हिने सर्वाधिक पाच बळी मिळवले.
(WPL Delhi Capitals Beat RCB By 60 Runs Lanning Shafali And Norris Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश