विश्व रेसलिंग एंटरटेनमेंट सुपरस्टार जॉन सीनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ती पोस्ट पाहून भारतीय क्रिकेट चाहते गोंधळात पडले आहेत. जॉन सीना याने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंट वर भारतीय कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे.
जॉन सीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये विराटने हातामध्ये बॅट घेऊन भारतीय संघाची जर्सी घातलेली दिसून येत आहे. जॉन सीनाने पोस्ट केलेल्या फोटोवर लोक चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. खूप लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, जॉन सीनाने विराट कोहलीचा हा फोटो पोस्ट का केला आहे.
जॉन सीना या फोटो सोबत कोणतेही कॅप्शन लिहिले नाही. या फोटोला सात लाखापेक्षाही जास्त लोकांनी लाईक्स आले आहे.
https://www.instagram.com/p/CQBhrvStF0d/
खरंतर जॉन सीना यांनी विराट कोहलीचा फोटो पोस्ट करणे, हे पहिल्यांदा झाले नाही. जॉन सीनाने याच्या अगोदर 2019 च्या विश्वचषकादरम्यान श्रीलंकेविरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यादरम्यानचा विराटचा फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये देखील कोणतेही कॅप्शन लिहिलेले नव्हते. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत की त्याने दुसऱ्यांदा देखील विराटचा फोटो का पोस्ट केला आहे. (Wrestler John Cena is a fan of Virat Kohli? posted a photo on Instagram)
भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने अनेक मोठमोठे विक्रम तोडले आहेत. विराट कोहली सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे .जिथे भारतीय संघ 18 जून पासून साउथॅम्पटनमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या अंतिम सामन्यासाठीचा भारतीय संघाने जोरदार सराव सुरू केला आहे. तसेच न्यूझीलंड संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! भारत-न्यूझीलंडसमोर मोठा प्रश्न, कसोटी चॅम्पियनशीप फायनल सामन्यात येणार ‘हा’ मोठा व्यत्यय?
जेव्हा प्रियंका चोप्रा म्हणाली होती, मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न करायला आवडेल; व्हिडिओ होतोय व्हायरल