---Advertisement---

मोठी बातमी! भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूची रुपेरी कामगिरी, जिंकले रौप्य पदक

On: शनिवार, जुलै 24, 2021 12:24 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिपिंक २०२० मध्ये शनिवारी (२४ जुलै) वेट लिफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एका पदकाची नोंद झाली आहे. महिला वेट लिफ्टिंग खेळात ४९ किलो वजनी गटात भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूने रौप्य पदक जिंकले आहे. हे यावर्षीचे समर गेम्समधील भारताचे पहिलेच पदक आहे. यामुळे भारतीय चाहते आनंदी आहेत.

यासोबतच तिने आपल्या नावावर एक विक्रमही केला आहे. ती ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरी यांनी ऑलिंपिक वेट लिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.

या सामन्यात चानूने स्नॅच ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलो वजन उचलले. याव्यतिरिक्त या खेळात चीनच्या झिहुई हो हिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक

-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट

-आनंदाची बातमी: भारताचा प्रविण जाधव- दिपीका कुमारी जोडी तिरंदाजीत उपांत्यपुर्व फेरीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---