भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला आयपीएलमध्ये खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना एलिमिनेटर व दुसऱ्या क्वालिफायर सामन्याला मुकला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. पण तरीही त्याच्या तंदुरुस्तीवर त्याच्या भारतीय संघातील समावेशाबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही बीसीसीआयने सांगितले होते.
त्यामुळे तो सध्या भारतीय संघासह ऑस्ट्रेलियामध्ये गेला असून तो तिथे त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी तो सराव सत्रात घाम गळताना दिसला आहे.
दुखापतीतून सावरण्यासाठी कोणत्याही क्रिकेटपटूला थोडा काळ लागतो. त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते. 36 वर्षीय वृद्धीमान साहा हासुद्धा बीसीसीआयचे फिजिओ नितीन पटेल आणि निक वेब या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे.
वृद्धिमान साहाने बुधवारी (19 नोव्हेंबर) नेटमध्ये श्रीलंकेचा माजी डावखुरा गोलंदाज नुवान सेनेविरत्ने आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गाराणी यांच्या गोलंदाजीचा बराच वेळ सामना केला. या काळात साहाने यष्टीरक्षण केले नाही. त्यामुळे तो दुखापतीतून बरा झाला की नाही हे बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओवरून पूर्णपणे कळू शकत नाही. पण तो दुखापतीतून सावरत असल्याचे मात्र दिसून येत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1329004659860619264?s=19
भारताकडून 37 कसोटी सामन्यांत 1238 धावा करणारा साहा नेटमध्ये सहजपणे सराव करत होता. तथापि, व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की दोन्ही थ्रो डाऊन स्पेशालिस्ट आपल्या पूर्ण सामर्थ्याने साहाविरुद्ध गोलंदाजी करत नव्हते. कारण दुखापतीनंतर तो पुन्हा लय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी साहा पूर्ण तंदुरुस्त होईल, असा विश्वास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी नुकताच व्यक्त केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
डेविड वॉर्नरच्या मधव्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाण्यास सज्ज
कोहलीची अनुपस्थिती ‘या’ खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी