---Advertisement---

पंत-साहापैकी या खेळाडूला मिळाली संधी; द. अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

---Advertisement---

विशाखापट्टणम। उद्यापासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात(India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्या विशाखापट्टणम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने आज 11 जणांचा भारतीय संघ(India Playing XI) घोषित केला आहे. या 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाला(Wriddhiman Saha) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी रिषभ पंतला(Rishabh Pant) बाहेर बसावे लागणार आहे.

त्याचबरोबर रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि मयंक अगरवाल(Mayank Agarwal) हे सलामीवीर असतील. त्याचबरोबर हनुमा विहारीलाही(Hanuma Vihari) या कसोटीसाठी 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याने ऑगस्टमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती.

तसेच गोलंदाजांमध्ये आर अश्विन(R Ashwin) आणि रविंद्र जडेजा(Ravindra Jadeja) हे फिरकीपटू तर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी(Mohammed Shami) हे वेगवान गोलंदाज 11 जणांच्या संघात आहेत.

या संघाचे नेतृत्व विराट कोहली(Virat Kohli) करेल. तर अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) उपकर्णधार असेल.

असा आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 11 जणांचा भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, वृद्धिमान सहा(यष्टीरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी.

https://twitter.com/BCCI/status/1178931443176636416

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं! यादिवशी होणार आयपीएल २०२०चा लिलाव

…तर कोहलीची टीम इंडिया भारतात करणार ‘विराट’ विश्वविक्रम

पहा व्हिडिओ: मार्नस लॅब्यूशानेने पँट निसटल्यानंतरही केले अफलातून धावबाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment