महिला टी-20 विश्वचषकाची सुरुवात भारतीय संघासाठी अपेक्षेप्रमाणे झाली. पाकिस्तानविरुद्ध अभियानाची सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ मैदानात आला आणि हा सामना 7 विकेट्सच्या अंतराने जिंकला. भारताला मिळालेल्या या विजयात जेमिमा रॉड्रिग्ज हिचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. जेमिमाने संघासाठी अर्धशतक ठोकत शेवटच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण धावा साकारल्या. ही खेळी जेमिमासाठीही खास आहे कारण तिला मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकात जागा मिळाली नव्हती. टी-20 विश्वचषकात मात्र तिने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.
मागच्या वर्षीच्या महिला वनडे विश्वचषकात जेमिमा रॉर्ड्रिग्ज (Jemimah Rodrigues) भारतीय संघाचा भाग नव्हती. संघात जागा न मिळणे, हा तिच्यासाठीही धक्का होता. 2021 मध्ये खेळलेल्या पाच वनडे सामन्यांमध्ये एकदाही तिला 10 धावांची खेळी करता आली नव्हती. मात्र, विश्वचषकात जागा न मिळाल्यानंतरही तिने धीर सोडला नाही आणि नव्या जोमाने तयारीला लागली. तिने संघात पुनरागमन करण्यापूर्वी मुंबईत 14 वर्षीय खेळाडूंसोबत क्रिकेट सामने खेळले.
संघात पुनरागमनाविषयी बोलतान जेमिमा रॉर्ड्रिग्ज म्हणाली, “संघातून बाहेर झाल्यानंतर मी प्रशांत शेट्टींकडे गेले आणि आम्ही एक प्लॅन बनवला. मला आठवड्यात दोन सामने खेळायचे होते आणि त्यानंतर सराव देखील करायचा होता. रविवारी सरावाला सुट्टी असायची. यादरम्यान मी स्वतःला एक आव्हान दिले. मी फ्लॅट विकेट (वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी) टर्निंग ट्रॅकवर (फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी) होते. मुंबईच्या आझाद मैदानावर 14 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील मुलांसोबत सामने खेळले. सकाळच्या वेळी खेळपट्टीवर दव असल्यामुळे चेंडू खूप स्विंग होत असायचा आणि दिवस जसजसा वर येईल, तसतसा चेंडू टर्न घेऊ लागायचा. या सरावामुळे माझी खेळी सुधारली.”
जेमिमाने पाकिस्तानविरुद्ध रविवारी (12 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या सामन्यात 38 चेंडूत 53 धावा कुटल्या. संघासाठी विजयी चौकार देखील तिनेच मारला. सामना संपल्यानंतर जेमिमा म्हणाली, “मला नाहीत नाही काय बोलावं. मला माहिती होते की, शेवटपर्यंत मी खेळपट्टीवर उभी राहिले तर आम्ही जिंकणार आहोत. ही खेळी माझ्यासाठीही खास होती. मोठ्या काळापासून माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. मी माझ्या आई वडिलांसाठी ही खेली समर्पित करू इच्छिते. ते दोघेही स्टेडियममध्ये आहेत, ही खेळी त्यांच्यासाठी.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये पाकिस्तान संघाने 4 बाद 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने भारताने हे लक्ष 19 षटकांमध्ये तीन विकेट्स गमावून गाठले. भारतीय संघाला विश्वचषकातील त्यांचा दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळायचा आहे. (WT20WC Jemima Rodrigues, who hit a match-winning four against Pakistan, did not get a chance in the World Cup team last year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितसह ‘या’ तीन भारतीयांनी कसोटी पदार्पणातच काढलेला विरोधी गोलंदाजांचा घाम, एक दिग्गजही यादीमध्ये
BREAKING: गल्फ जायंट्स ठरला इंटरनॅशनल लीग टी20 चा पहिला बाहशाह