भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करणार असून विजयासाठी त्याला शक्य ते सर्व उपाय करावे लागणार आहेत. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे सराव सत्रात पाहायला मिळाले.
भारत आणि ऑस्ट्रेलियन (India Vs Australia) संघ बुधवारी (7 जून) डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात (WTC Final) आमने सामने असतील. डब्ल्यूटीसीची गदा उंचावण्यासाठी भारतीय संघाकडे ही सलग दुसऱी संधी असेल. तर ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात पहिल्यांदाच पोहोचला आहे. दोन्ही बलाढ्य संघांमधील ही लढत रोमांचक होणार यात शंका वर्तवण्याचे कारण नाही. दोन्ही संघ आमल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह या सामन्यासाठी मैदानात उतरतील. पण अशातच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) याला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.
मंगळवारी (6 जून) रोहित शर्मा आपल्या सहकाऱ्यांसह मैदानात सराव करत होता. याच वेळी त्याच्या डाव्या अंगठ्याला चेंडू लागला आणि दुखापत झाल्याचे समोर येत आहे. चेंडू लागल्यानंतर संघाच्या फिजिओंनी त्याच्या अंगठ्याला पट्टी देखील बांधली. रोहितने पट्टी बांधून पुन्हा सरावाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरक्षाचे उपाय म्हणून त्याने पुन्हा आपला निर्णय बदलला, असे सांगितले जात आहे. रोहित शर्मा डाव्या अंगठ्याला पट्टी बांधून सराव सत्रातून बाहेर पडल्याने चाहते आणि सहकारी खेळाडूंची चिंता नक्कीच वाढली आहे.
Rohit Sharma has got stuck in his left thumb while batting at the nets. (Reported by OneCricket). pic.twitter.com/XYTKh7TYyd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2023
दरम्यान, भारतीय संघासाठी यावेळी डब्ल्यूटीसीची गदा उंचापणे महत्वाचे आहे. कारण मागच्या वेळीही त्यांना अंतिम सामन्यात येऊन न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही भारतासमोर ऑस्ट्रेलियन संघ अशल्याने आव्हान नक्कीच सोपे नसेल. इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमची परिस्थिती भारतापेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी अधिक अनुकूल असेल, असे जाणकारांचे मत आहे. (WTC Final । Due to injury, Rohit Sharma left the practice session in the middle)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL लिलावाचा थरार सुरू! पहिल्या विभागात हे खेळाडू ठरले महागडे, वाचा सविस्तर
ओडिसा रेल्वे अपघातावर हळहळला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला, ‘माझे हृदय भारतात…’