---Advertisement---

भारतीय संघ किती धावसंख्या चेस करू शकतो? अजिंक्य रहाणेच्या उत्तरात पाहायला मिळाला आत्मविश्वास

On: शनिवार, जून 10, 2023 4:35 PM
Ajinkya Rahane
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संग ऑस्ट्रेलियापेक्षा 296 धावांनी मागे होता. भारतीय संघाचे इतर महत्वाचे फलंदाज पहिल्या अपयशी ठरले. मात्र, 18 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे तारणहार ठरला. तिसऱ्या दिवशी सराणेच्या 89 धावांमुळे भारतीय संघ फॉलोऑन टाळू शकला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणेने माध्यमांसमोर खास प्रतिक्रिया दिली.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 4 बाद 123 धावा केल्या. शनिवारी (10 जून) म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस असेल, जो भारतीय संघासाठी महत्वाचा ठरेल. भारताला जर डब्ल्यूटीसीची ट्रॉफी नावावर करायची असेल, तर शनिवारी झटपट विकेट्स घ्याव्या लागतील. भारतीय गोलंदाज जर झटपट विकेट्स घेऊ शकले नाही, तर ऑस्ट्रेलियन संघ मोठी धावसंख्या उभी करेल, जी भारतीय संघ गाठू शकणार नाही. असे असले तरी, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने किती लक्ष्य दिले, तरी ते गाठण्यासाठी तयार दिसत आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेश संपल्यानंतर रहाणे माध्यमांसमोर म्हणाला, “ऑस्ट्रेलियाने कितीही धावा केल्या, तरी आम्ही हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करू. आज आमजी गोलंदाजी चांगली राहिली. पण आम्हाला आपले प्रदर्शन पुन्ही प्रत्यक्षात उतरवायचे आहे. पहिले सत्र खूपच महत्वाचे असेल. जर झटपट विकेट्स घेतल्या, तर आम्ही त्यांना धावा करण्यापासून रोखू शकतो. संघाने चांगले पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियन संघ सध्या थोडा आघाडीवर आहे. पण पहिले सत्र आणि एकंदरीत दिवसभरात परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल राहिली, तर संघ पुनरागमन करू शकतो. पिछाडीवर असताना तुम्ही स्वतःला कशाप्रकारे पाठवळ देता, हे महत्वाचे आहे.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. पहिल्यया दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 327 होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तारात भारतीय संघ मात्र 69.4 षटकांमध्ये 296 धावांपर्यंत मजल मारू शकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड (163) आणि स्टीव स्मिथ (121) यांनी वैयक्तिक शतके ठोकली. तर भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या रहाणेचे शतक अवघ्या 11 धावांनी हुकले. रहाणेने दबावाच्या परिस्थितीत 129 चेंडूत 89 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. (Ajinkya Rahane gave a big reaction about chasing the target)

महत्वाच्या बातम्या –
अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---