जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 7 जूनपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने रिषभ पंत याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, अंतिम सामन्यापूर्वी पंतची उणीव भासत आहे, पण केएस भरत आणि ईशान किशन दोघेही चांगले खेळाडू आहेत. ते दोघे चांगली कामगिरी करू शकतात. कारण, दोघांकडे भरपूर अनुभव आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याचा मागील वर्षी 30 डिसेंबर रोजी रस्ते अपघात झाला होता. या अपघातामुळे तो मैदानापासून दीर्घ काळ लांब आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताने अनेक मालिका खेळल्या. तसेच, आयपीएल 2023 हंगामातही तो सहभागी झाला नव्हता. अशात त्याच्या अनुपस्थितीत केएस भरत आणि ईशान किशन (KS Bharat And Ishan Kishan) यांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात सामील केले गेले आहे. या दोघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळणार आहे.
‘केएस भरत आणि ईशान किशनला पाठिंबा देणे गरजेचे’
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने दोन्ही खेळाडूंना चांगले म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “रिषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे आणि निश्चितच प्रत्येकजण त्याला मिस करत आहे. मात्र, तुम्ही त्याबाबत जास्त काही करू शकत नाहीत. जे खेळाडू तिथे आहेत, त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. आपल्याला केएस भरत आणि ईशान किशनला पाठिंबा द्यावा लागेल. ईशानही पंतसारखाच आहे. त्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.”
पुढे बोलताना चहल म्हणाला की, “ईशान किशन एक सलामीवीर आहे. मी असे म्हणत नाहीये की, तो कसोटी सामन्यात खेळू शकत नाही, पण तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला उतरतो. अशात 6व्या क्रमांकावर गोष्टी वेगळ्या असतील. तसेच, केएस भरत हादेखील या क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकतो.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 7 ते 11 जूनदरम्यान डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. या सामन्यात दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी उतरतील. भारतीय संघ के ओव्हलमध्ये पोहोचला आहे आणि तिथे सर्व खेळाडू सराव करत आहेत. अशात हा सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (wtc final 2023 everyone is missing rishabh pant says cricketer yuzvendra chahal read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रॅफिकमध्ये अडकूनही धोनीने चाहत्याचा दिवस बनवला खास! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नशीबवान आहेस’
गर्लफ्रेंड पटवण्यात ख्रिस गेल माहीर! भारतातही लावला नंबर, स्वत:च केला खुलासा