भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पहिल्याच दिवशी रंगात आली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत पोहोचवले. डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला अपेक्षित सुरुवात मिळाली नव्हती. मात्र, त्यानंतर या दोघांनी डाव सांभाळला. दरम्यान, स्टीव स्मिथची एक रिएक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. बुधवारी (8 जून) ही लढत सुरू झाली होती. उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक रोहित शर्माने जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणे सुरूवात मिळाली देखील होती. मात्र, नंतर स्टीव स्मिथ (Steve Smith ) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी गोलंदाजांचा घाम काढला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 धावा केल्या. स्मिथ 95*, तर हेड 146* धावांसह मैदानात आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत या दोघांमध्ये 251 धावांची भागीदारी झाली.
अशातच स्मिथचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने टाकलेला एक चेंडू स्मिथला खूपच आवडला आणि यासाठी त्याने गोलंदाजाला दाद दिल्याचे व्हिडिओत दिसते. असे असले तरी, खास चर्चा होत आहे ती स्मिथच्या रिएक्शनची. आयसीसीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, “या रिएक्शनसाठी स्मिथला पुरस्कार दिला पाहिजे.”
https://www.instagram.com/reel/CtMJuNQAiXf/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवसी स्मिथ आणि हेड ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करतील, तेव्हा त्याच्याकडे शतक करण्याची संधी असेल. अवघ्या पाच धावा केल्यानंतर स्मिथ आपले 31 कसोटी शतक करेल. स्मिथने हे शतक केले, तर तो मॅथ्यू हेडनलाही मागे सोडेल. सोबतच हे भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील त्याचे नववे शतक असणार आहे. या शतकाच्या जोरावर तो विराट कोहली, रिकी पाँटिंग आणि सुनील गावसकर या दिग्गजांनाही मागे सोडेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात स्मिथ दुसरा सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरेल. यादीत पहिला क्रमांक सचिन तेंडुलकरचा आहे, ज्याने 11 शतके केले आहेत. (Steve Smith impressed with Mohammad Shami’s amazing bowling)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट