---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याने ‘या’बाबतीत मोडले सारे विक्रम

On: बुधवार, जुलै 28, 2021 8:43 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. एजबॅस्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर १८ ते २३ जून या काळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान खेळला गेलेला हा सामना इंग्लंडने जिंकत इतिहास रचला. त्याचवेळी, हा सामना आता सर्वाधिक पहिला गेलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना बनला आहे.

सर्वात जास्त पाहिला गेलेला क्रिकेट सामना
आयसीसीने नुकतीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या बाबतीतील विशिष्ट आकडेवारी जाहीर केली. ज्यामध्ये हा सामना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर किती लोकांनी पाहिला याबाबतची माहिती आहे.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, ‘जगभरातील विविध ८९ भागातील १३ कोटी ६ लाख लोकांनी हा सामना पाहिला. भारतामध्ये सामन्याला सर्वाधिक प्रेक्षक लाभले. स्टार स्पोर्ट्स आणि दूरदर्शनवर ९४.६ टक्के लोकांनी हा सामना पाहिला. इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी, तेलगू, तमिल व कन्नड भाषेत या सामन्याचे थेट प्रसारण केले गेले होते. न्यूझीलंडमधील देखील २ लाख लोकांनी रात्रभर जागून हा सामना पाहिला.’

टेलिव्हिजन प्रसारणाव्यतिरिक्त बोलायचे झाल्यास, आयसीसी टीव्हीवर ६,६५,१०० लोकांनी हा सामना पाहिला. सामन्यातील सर्व व्हिडिओ ५० कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले. यामध्ये फेसबुकचा वाटा ४२ कोटी ३० लाख इतका मोठा होता. राखीव दिवसापर्यंत गेलेल्या सामन्याच्या अखेरच्या दिवशी ६ कोटी ५७ लाख लोकांनी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. या सामन्याला इंस्टाग्रामवर ७ कोटी प्रेक्षक लाभले.

न्यूझीलंडने जिंकले होते विजेतेपद
या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद न्‍यूझीलंड संघाने भारताला ८ गड्यांनी पराभूत करत आपल्या नावे केलेले. न्यूझीलंडने भारताला खेळाच्या तिन्ही विभागात पछाडले. न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन सामन्याचा मानकरी ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मग बीसीसीआय विराटला बाहेर बसणार का?’ ऑलिम्पिक खेळाडूंवर टीका करणाऱ्यांवर भडकला वीरधवल खाडे

इशान किशन, संजू सॅमसन नव्हे तर ‘हा’ फलंदाज करणार दुसऱ्या टी२० सामन्यात यष्टीरक्षण?

पुन्हा एकदा मंधनाची तुफानी फलंदाजी, १५६ च्या स्ट्राईक रेटने धावा करत जिंकून दिला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---