भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा प्रारंभ १८ जूनपासून झाला आहे. परंतु पहिल्या दिवशी पावसाचे आगमन झाल्यामुळे पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर १९ जूनला खऱ्या अर्थाने या सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने आपली पकड मजबूत केली होती.
त्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे व्यत्यय आल्याने एकही चेंडूचा खेळ झाला नाही. अशात हा सामना अनिर्णीत राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जर हा सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. जर असे झाले तर न्यूझीलंड संघाला याचा मोठा फायदा होणार आहे. तर भारतीय संघाला तोटा होणार आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी जोरदार सुरुवात केली होती. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या होत्या. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. काइल जेमिसनची वेगवान गोलंदाजी आणि निल वॅग्नर व ट्रेट बोल्टची मिळालेली साथ, यामुळे भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला होता. (WTC final : Indian team will be in trouble if final match draw)
भारताच्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला टॉम लेथम आणि डेवोन कॉनवे यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. पुढे कॉनवे ५४ तर लेथम ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विलियमसन नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे. त्याच्यासोबत रॉय टेलरही नाबाद आहे. न्यूझीलंड संघाला तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.
भारतीय संघाला असे होऊ सकते नुकसान
भारतीय संघ सध्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारी यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानी आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जर अनिर्णीत राहिला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघ १२३ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर भारतीय संघ १२१ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. जर भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जेतेपद मिळवण्यात यश आले, तर भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान होईल.
भारतीय संघ १२४ रेटिंग पॉइंट्ससह आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत पहिल्या स्थानावर झेप घेईल. तर न्यूझीलंड संघाची घसरण होऊन न्यूझीलंड संघ १२१ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर घसरेल. परंतु जर न्यूझीलंड संघाला या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर, न्यूझीलंड संघ १२६ रेटिंग पॉइंट्ससह पहिल्याच स्थानी कायम राहील. दुसरीकडे भारतीय संघाला १२० पॉइंट्सवर समाधान मानावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
पावसाच्या व्यत्यानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी
WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती
सोडा-चखण्याचा बंदोबस्त झालाय! सिराजच्या ‘त्या’ फोटोमुळे गुरुजींवरही बनले भन्नाट मीम्स