---Advertisement---

कोहलीला तंबूत धाडणाऱ्या जेमिसनने गायले त्याचे खूप गुणगान, पाहा काय म्हणाला

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २१७ धावांवर संपुष्टात आला आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवशी (२० जून) पूर्णपणे न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांचा दबदबा होता. न्यूझीलंड संघाकडून काइल जेमिसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. यामध्ये कर्णधार कोहलीच्या विकेटचा देखील समावेश आहे. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेमिसनने कोहलीचे तोंडभरून कौतुक  केले आहे.

जेमिसनने  दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना रोहित शर्माला माघारी धाडले होते, तर तिसऱ्या दिवशी त्याने कोहली, पंत, ईशांत आणि  बुमराहला तंबूत पाठवले आहे. या सामन्यात ५ गडी बाद करताच त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आतापर्यंत  ८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४४ गडी बाद करण्यात यश आले आहे. ८ सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत त्याने जॅक कोवीला मागे टाकले आहे. जॅक कोवीने ८ कसोटी सामन्यात ४१ गडी बाद केले होते.

विराट कोहलीबद्दल बोलताना काइल जेमिसन म्हणाला.

आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये जेमिसनने कोहलीबद्दल भाष्य केले आहे. त्याने म्हटले कि, “कोहली भारतीय संघाचा एक प्रमुख भाग आहे आणि तो सामना आपल्या पद्धतीने खेळण्यात विश्वास ठेवतो. त्याच्या विरुद्ध चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर त्याला बाद करणे हे सर्व खूप चांगले होते.” (wtc final kyle jamieson praises virat kohli )

तसेच तो पुढे म्हणाला कि, “तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे आणि तो भारतीय संघाचा कवच आहे. मला वाटते कि, त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. एक गोलंदाज म्हणून तुम्ही विराट कोहली समोर खेळताना गोष्टींचे योग्य नियोजन करू शकत नाही. तुम्ही कोणीही असाल तरीही तो संघाचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि त्याला लवकर बाद करणे माझ्यासाठी सुखद आणि महत्वपूर्ण होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---