जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा 8 विकेट राखून पराभव केला होता. याबरोबरच न्यूझीलंड जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा किताब मिळवणारा पहिला संघ ठरला. परंतु, भारताचा झालेल्या पराभवानंतर संघावर आणि विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. पण याचदरम्यान न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन भारतीय संघाच्या पाठीशी उभा राहिला आहे. विलियम्सनने अंतिम सामन्याच्या शेवटच्या डावात अर्धशतक झळकावले होतो. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंड संघाला विजय मिळाला.
विलियम्सनने भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर देत म्हटले आहे की एक अंतिम सामना ठरवू शकत नाही की भारतीय संघ किती मजबूत आहे.
विराट आणि विलियम सनसोबतचा फोटो झाला व्हायरल
विलियम्सनने इंडिया टूडेशी बोलताना सांगितले की, “अंतिम सामना उत्साह देतो. परंतु, खरी परिस्थिती काय आहे हे कधीच दाखवत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतीय संघ किती मजबूत आणि महान संघ आहे. भारतीय संघाविरुद्ध सामना जिंकणे ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, यावरून हे सिद्ध होत नाही की भारतीय संघ किती मजबूत आहे किंवा त्यांना अजून किती प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये काही शंका नाही की भारतीय संघ खूप सामन्यांमध्ये विजय मिळवेल.”
“तुम्हाला त्यांच्या ताकदीबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. भारतीय संघाजवळ असे वेगवान आक्रमण आहे, जे जगामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जातात. त्यांचे फिरकीपटू उत्कृष्ट कामगिरी करतात, तर भारतीय संघातील फलंदाजाबद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही.”
त्याचबरोबर विलियम्सनने भारतीय खेळाडूंना खेळाचे दूत म्हणून संबोधले असून, त्याने म्हटले आहे की भारतीय चाहत्यांचे त्यांच्या संघावर असलेले प्रेम, त्याला आवडते. तो पुढे म्हणाला की, “भारत देश खेळाबद्दल अशी भावना आणतो की आपण सर्वजण त्यांचे कौतुक करू शकतो. त्यांच्या उत्कट भावनेचे त्यांना बक्षीसही मिळते. ते स्वत:ला खेळाचे दूत म्हणून स्थान देतात.’
विलियम्सन म्हणाला की, सामन्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य होते. परंतु वेळेच्या अडचणीमुळे सामना अनिर्णित होण्याची शक्यता जास्त होती. न्यूझीलंड संघाचा कर्णधार म्हणाला, ‘कोणताही निकाल शक्य होता आणि आम्ही शक्य तितके प्रयत्न करत होतो. आम्ही गेल्या काही दिवसांपेक्षा काही वेगळे करत नव्हतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा खेळ कसा बदलता येईल, याचा विचार करत होतो.’
विलियम्सनने हे देखील मान्य केले की विराट आणि चेतेश्वर पुजारा लवकर बाद होणे त्याच्या संघासाठी खूप चांगले होते. तो पुढे म्हणाला की, ‘शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला विकेट घेणे खूप चांगले होते. यामुळे त्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता वाढली. त्यानंतर भारतीय संघाने देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याजवळ संधी देखील होती आणि त्यावेळी गोलंदाजांना खेळपट्टीकडून साथ देखील मिळत होती. हे आमच्यासाठीही खूप अवघड बनत चालले होते.’
महत्त्वाच्या बातम्या –
चूकिला माफी नाही! गोव्यातील गावात कचरा फेकण्याबद्दल अजय जडेजावर सरपंचांकडून कारवाईचा बडगा
‘तू यशास पात्र’! एकाच दिवसात ३ सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची मास्टर ब्लास्टरने थोपटली पाठ
काय सांगता! ‘त्या’ मीमवाल्या पाकिस्तानी चाहत्याला चक्क कोकाकोलाकडून आली होती जाहिरातीची ऑफर