जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. कारण, सलामीवीर शुबमन गिल बाद झाला की नाही? या प्रश्नावरून वादाला तोंड फुटले. स्कॉट बोलँड याच्या चेंडूवर गलीमध्ये उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीन याने गिलचा झेल पकडला होता, ज्यामध्ये काही लोकांनी म्हटले की, चेंडू मैदानाला स्पर्श करत होता, पण तिसऱ्या पंचांनी गिलला बाद घोषित केले.
पंचांच्या या निर्णयावर क्रिकेटजगत दोन गटात विभागले गेले. एका गटाने म्हटले की, शुबमन गिल (Shubman Gill) नाबाद होता. तसेच, दुसऱ्या गटाने पंचांच्या निर्णयाला योग्य म्हटले. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हेदेखील दुसऱ्या गटात सामील झाले. त्यांनी पंचांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तसेच, कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने शानदार झेल पकडल्याचेही म्हटले.
शुबमन गिलच्या झेलावर मांजरेकरांची प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “हे पाहा, जर तुम्ही फ्रीज फ्रेमबद्दल बोलाल, तर वाद निर्माण होतो. असे झेल नेहमी चालू स्थितीत (मोशन) पाहिले पाहिजेत. आम्ही अनेकदा पाहिले आहे की, जेव्हा एक टप्पा खाल्ल्यानंतर झेल घेतला जातो, तेव्हा सर्वकाही स्पष्ट दिसते. मी झेल पूर्ण मोशनमध्ये पाहिला, तेव्हा मला कुठेच वाटले नाही की, काही संशय आहे. तो चांगला झेल होता. मी नेहमी मानतो की, खालचे झेल नेहमी मोशनमध्ये पाहिले पाहिजेत. पूर्ण मोशनमध्येच तुम्हाला समजते की, हा झेल आहे की नाही.”
पुढे बोलताना गावसकर असे म्हणाले की, “चाहते फ्रीज झालेला फोटो पाहत आहेत आणि म्हणत आहेत की, चेंडू जमिनीला स्पर्श करत आहे. मात्र, चालू स्थितीत आणि चांगल्या मोशनमध्ये तो शानदार झेल वाटत आहे. त्यामुळे जर तुम्ही मला विचाराल की, हा झेल होता की नाही, तर मी म्हणेल की, तो शानदार झेल होता.”
शुबमन गिल याला सलग दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. त्याने 18 धावांवर तंबूचा रस्ता धरला. त्यापूर्वी पहिल्या डावात गिलने फक्त 13 धावा केल्या होत्या. (wtc final sanjay manjrekar on cameron green catch said he caught a great catch )
महत्वाच्या बातम्या-
“देशासाठी खेळतोय हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा”, विराट झाला भावूक
अखेर आशिया कपचा तिढा सुटला! ‘या’ ठिकाणी होणार भारत-पाकिस्तान ‘महामुकाबला’