जागतिक कसोटी अजिंक्यपदाला सुरुवात झाली असून भारताने टॉस जिंकत गोलंदाजी घेतली आहे. तसेच यावेळी खेळपट्टीवर आलेल्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी आपल्या डाव्या हाताला काळी फीत लावली आहे. जाणून घेऊ या दोन्ही संघानी आपल्या हाताला काळी फीत का बांधली आहे.
दोन्ही संघानी बांधली काळी फीत
नुकत्याच झालेल्या ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील मृतांच्या स्मृतीसाठी सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाने क्षणभर मौन पाळले. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहत आपल्या हातावर काळी फीत बांधल्याचे दिसून येते. या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ हातावर काळ्या फीती बांधून खेळणार आहे.
ओडिशाच्या रेल्वे घटनेबाबत संघांनी कोश व्यक्त केला
पीए यंत्रणेने जाहीर केले की बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातातील बळींच्या सन्मानार्थ एक क्षण मौन पाळण्यात येईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ओव्हल येथे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यादरम्यान हृदयस्पर्शी घटना घडली. दोन्ही संघानी घटनेबाबत कोश व्यक्त केला.
या शोकांतिकेत 288 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 1000 लोक जखमी झाले. त्यामुले ती दोन दशकांहून अधिक काळातील भारतातील सर्वात वाईट रेल्वे आपत्तींपैकी एक बनली आहे. खेळाडूंची श्रद्धांजली ही दु:खाच्या काळात एकता आणि सहानुभूतीची आठवण करून देते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…