यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने 2022 अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्याच्या बॅटने टूर्नामेंटच्या 4 डावात 76 च्या सरासरीने 229 धावा केल्या होत्या. त्यात शतकी खेळीही होती. त्यानंतर 19 वर्षीय खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. फेब्रुवारीमध्ये, त्याला दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली. आता दुलीप ट्रॉफीमध्येही धुल आपली जादू दाखवत आहे.
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विभागाचा सामना पूर्व विभागाशी होत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आलेल्या यश धुलने शतक पूर्ण केले. त्याने 131 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने फलंदाजी अधिक तीव्र केली. त्याने पुढील 50 धावा 36 चेंडूत पूर्ण केल्या. 150 धावा पूर्ण करताना त्याने 21 चौकारांसह 2 षटकारही लगावले. धुल 243 चेंडूत 193 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर आता यशच्या या विशेष खेळीच्या जोरावर त्याने स्वत:साठी टीम इंडियाचे द्वार खुले केले असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा दिसला पाकिस्तानी खेळाडूंचा बालिशपणा! श्रीलंकेविरुद्धचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील