भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय संघ बांग्लादेशसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेत भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालवर सर्वांच्या नजरा असतील. जयस्वालची कसोटी कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. जयस्वालने आतापर्यंत केवळ 9 कसोटीत 1028 धावा केल्या आहेत. जयस्वालने कसोटीतही तीन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या मालिकेत जयस्वालने 718 धावा करत धमाका केला होता. आता पुन्हा एकदा बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत सर्वांच्या नजरा जयस्वालवर असतील.
बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेदरम्यान जयस्वालला इतिहास रचण्याची संधी असेल. जयस्वाल विश्वविक्रम करण्याच्या जवळ आहे. सध्या एका वर्षात कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. ब्रेंडन मॅक्युलमने 2014 साली कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 33 षटकार ठोकले होते. तर जयस्वालने 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 26 षटकार मारले आहेत. म्हणजेच 8 षटकार मारल्यानंतर जयस्वाल एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरणार आहे. असे केल्याने ब्रेंडन मॅक्क्युलमचा विश्वविक्रम मोडण्यात जयस्वाल यशस्वी ठरेल.
कसोटीत एका वर्षात सर्वाधिक षटकार
33- ब्रेंडन मॅक्युलम (2014)
26- यशस्वी जयस्वाल (2024)*
26 – बेन स्टोक्स (2022)
22 – ॲडम गिलख्रिस्ट (2005)
22 – वीरेंद्र सेहवाग (2008)
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी यशस्वी जयस्वालला भारतीय क्रिकेटची पुढची सुपरस्टार म्हटले आहे. मिशेल स्टार्सपासून स्टीव्ह स्मिथपर्यंत जयस्वाल यांना भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार म्हटले जाते. स्टीव्ह स्मिथने मान्य केले आहे की, जयस्वालने फार कमी वेळात आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटला चकित केले आहे. जयस्वाल हा जागतिक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार असेल, अशी मला पूर्ण आशा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला नोव्हेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. जयस्वालची खरी कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत असणार आहे. वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध जयस्वाल काय कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा-
काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्टीत फरक काय ? चेन्नईत भारत-बांग्लादेश कोणत्या खेळपट्टीवर खेळणार?
“काम अजून बाकी आहे…”, शतकी खेळीनंतर इशान किशनने उघड केले मनसुबे
भारताला चितपट करण्यासाठी बांगलादेशच्या संघाने सुरू केली तयारी, सरावाचे फोटो आले समोर