भारतीय संघाचा 21 वर्षीय स्टार खेळाडू यशस्वी जयसवाल याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजपुढे मोठी धावसंख्या उभारली. तसेच, यजमानांच्या झटपट विकेट्स घेत सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, या सामन्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या जयसवालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जयसवालने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याच्या बदोही गावातील लोक खूपच आनंदी झाले. मुलाच्या शतकानंतर वडील भूपेंद्र जयसवाल शुक्रवारी (दि. 14 जुलै) कांवड घेऊन बिहारच्या सुल्तानगंजसाठी रवाना झाले.
‘देशाचे नाव रोशन केले’
यशस्वी जयसवालचे वडील भूपेंद्र जयसवाल (Yashasvi Jaiswal Father Bhupendra Jaiswal) हे उत्तरवाहिनी गंगापासून कावडमध्ये पाणी घेऊन बाबा वैद्यनाथ धामची पदयात्रा सुरू करतील. सुल्तानगंजपासून देवघर 105 किमी दूर आहे. ते म्हणाले की, ते गुरुवारी रात्रीच मुंबईहून परतले आहेत. आता ते मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी बाबाचे दर्शन घेण्यास जात आहेत. यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याचे वडील भूपेंद्र जयसवाल (Bhupendra Jaiswal) म्हणाले की, “यशस्वीने फक्त भदोहीच नाही, तर उत्तरप्रदेश आणि देशाचे नावही रोशन केले आहे.”
जयसवाल कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा 17वा भारतीय
डॉमिनिका (Dominica) येथील विंडसर पार्क (Windsor Park) मैदानावर पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात जयसवालने 215 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने पहिले शतक झळकावले. या शतकानंतर तो आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावणारा 17वा भारतीय खेळाडू बनला.
मालिकेत भारत 1-0ने आघाडीवर
भारतीय संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला 1 डाव आणि 141 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतासाठी जयसवालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 387 चेंडूंचा सामना करताना 171 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा (103), विराट कोहली (76) आणि रवींद्र जडेजा (37) यांनीही मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, गोलंदाजी करताना यजमानांच्या पहिल्या डावात आर अश्विनने 5, जडेजाने 3, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच, दुसऱ्या डावातही अश्विन चमकला. यावेळी त्याने 7 विकेट्स, जडेजाने 2 आणि सिराजने 1 विकेट नावावर केली.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथील क्वीन्सपार्क ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. (yashasvi jaiswal father left for deoghar baba baidyanath yatra with kavada after he scored first century against wi in debut test)
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 47 वर्षांनंतर भारतासाठी ‘असा’ पराक्रम करणारा जयसवाल दुसराच खेळाडू, बातमी वाचलीच पाहिजे
विंडीजच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या यशस्वीचा जबरदस्त विक्रम, रोहित-धवनसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील