---Advertisement---

यशस्वी जयस्वालची आणखी एक दमदार खेळी; हा खेळाडू फ्लॉप…

---Advertisement---

9 फेब्रुवारीला 19 वर्षाखालील विश्वचषकातील अंतिम सामना 19 वर्षाखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षाखालील बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. परंतु या विश्वचषकात भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 400 पेक्षा जास्त धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.

या विश्वचषकानंतर आता यशस्वीने भारतात आपला पहिला प्रोफेशनल (व्यावसायिक) सामना खेळला आहे. यशस्वीने सीके नायडू ट्रॉफी 2020च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई विरुद्ध क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडिचेरी संघात झालेल्या या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली आहे.

यशस्वीने पहिल्या डावात 127 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी केली आहे. दरम्यान 243 चेंडूत तो 185 धावा बनवून बाद झाला. त्यामुळे तो केवळ 15 धावांनी शतकी खेळी करण्यास मुकला. 19 वर्षाखालील विश्वचषकानंंतर ही त्याची पहिली खेळी होती. ज्यामध्ये त्याने शकत केले आहे.

सीके नायडू ट्रॉफी 2019-20 या मोसमातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक तामोरेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी पाँडिचेरी संघाला त्यांनी 209 धावांवर सर्वबाद केले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि अमर खानने डावाची सुरुवात केली.

यावेळी खान आणि यशस्वी या खेळाडूंनी 98 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. यामध्ये खान 64 धावा करत बाद झाला. परंतु, यशस्वीने शतकी खेळी केल्यानंतरही फलंदाजी करत राहिला. खान आणि यशस्वीबरोबरच पहिल्या डावात हार्दिक तामोरेने 86 धावांची तर सर्फराज खानने 90 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या या फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे मुंबईने पहिल्या डावात 581 धावांचा डोंगर उभा केला. तसेच 372 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर पाँडिचेरीला दुसऱ्या डावात 141 धावांवरच रोखत मुंबईने हा सामना एक डाव 231 धावांनी विजय मिळवला. या डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही (Arjun Tendulkar) मुंबईकडून खेळताना चांगली कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याबरोबरच मिनाद मांजरेकरने 4 आणि श्रेयस गौरवने 3 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---