---Advertisement---

IND vs WI: 23 वर्षांच्या वयामध्ये यशस्वी जयस्वालची मोठी कामगिरी! सचिन- युवराज आणि विराटच्या क्लबमध्ये समावेश

On: शुक्रवार, ऑक्टोबर 10, 2025 6:58 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) नाबाद 78 चेंडूत 40 धावा करत तसेच राहुलने (KL Rahul) 54 चेंडूत 38 धावा करत यांनी 58 धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात दिली.

पण के एल राहुल फिरकीपटू जोमेल वारिकनच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर जयस्वालने साई सुदर्शनसोबत (Sai surdarshan) भागीदारी करत भारतीय डाव पुढे नेला आणि 145 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवं शतक पूर्ण करत शानदार खेळी केली.

भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालने एक शानदार कामगिरी केली आहे. फक्त 23 वर्षांच्या वयात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7वे शतक झळकावत इतिहास रचला. यामुळे तो भारतासाठी सर्वात कमी वयात सर्वाधिक कसोटी शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारे भारतीय खेळाडू:

सचिन तेंडुलकर – 11

यशस्वी जायसवाल – 7

रवी शास्त्री – 5

दिलीप वेंगसरकर – 5

याशिवाय, आपल्या शतकीय खेळीमुळे जयस्वालने आपलं कौशल्य सिद्ध केल आणि भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एक महत्वाचा रेकॉर्ड नोंदवला. फक्त 23 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3,000 धावा पूर्ण केल्या. हे करून तो त्या काही भारतीय फलंदाजांमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी इतक्या कमी वयात ही कामगिरी केली होती.

यशस्वी जयस्वालच्या आधी 23 वर्षांच्या वयात 3,000 धावा करणारे भारतीय खेळाडू:

सचिन तेंडुलकर – 8,696

विराट कोहली – 5,052

युवराज सिंग – 3,853

सुरेश रैना – 3,350

रवी शास्त्री – 3,224

यशस्वी जयस्वाल – 3,000

या आकडेवारीतून स्पष्ट दिसते की, जयस्वाल भारतीय क्रिकेटच्या उभरत्या स्टार्सपैकी एक म्हणून वेगाने आपली ओळख निर्माण करत आहे. 2023 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने सलग उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि इतक्या कमी वयात ह्या खास क्लबमध्ये स्थान मिळवून त्याने आपला करिअर रेकॉर्ड आणखी जबरदस्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---