गुरुवारी (11 मे) यशस्वी जयस्वाल याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. यस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावा ठोकल्या आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. कर्णधार संजू सॅमसन यानेही या विजयात 48 धावांचे योगदान दिले आणि जयस्वालची चांगली साथ दिली. सामना संपल्यानंतर यशस्वी जयस्वाल म्हणाला की, ही त्याच्या छोट्याशा कारकिर्दीतील सर्वात खास खेळी आहे, जी नेहमी त्याच्या लक्षात राहील.
सामना संपल्यानंतर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) म्हणाला, “ही खेळी मोठ्या काळापर्यंत माझ्या लक्षात राहील. मी फलंदाजीसाठी मैदानावर उतरलो, तेव्हा माझ्याकडे खूपच कमी वेळ असल्यासारखे वाटत होते. पण अचानक मला असे जाणवले की, सर्वकाही योग्य पद्धतीने होत आहे. मी ठरवले की, असाच खेळ कायम ठेवला पाहिजे, ही खेळी नेहमीच लक्षात राहील. माझे दिवसभराचे नियोजन आणि दिनक्रमाचे बरेच नियम आहेत, जे मी पूर्णपणे पाळतो. माझ्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. मी माझी एकाग्रता कायम ठेवण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न करतो आणि प्रत्येक सामन्यातून नवीन काहीतरी शिकत असतो. आपली खेळी पुढे घेऊन जात असताना या गोष्टी महत्वाच्या ठरतात.”
जयस्वालच्या मते तो चांगल्या प्रदर्शनासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट ठेवतो. तो म्हणाला, “20 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर मला डावाची सुरुवात करण्यासाठी जायचे असते. त्यामुळेच मी स्वतःला फिट आणि मानसिक दृष्ट्या मजबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. या गोष्टीमुळे मला आत्मविश्वास मिळतो.” दरम्यान, जयस्वालने गुरुवारी केलेल्या वादळी खेळीदरम्यान अवघ्या 13 चेंडूत म्हणजेच आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक आपल्या नावावर केले. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर होता. या दोघांनीही प्रत्येकी 14-14 चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
सामन्या संपल्यानंतर जयस्वाल शेवटची असेही म्हणाला की, जेव्हा कधी त्याला वेळ मिळेल, तेव्हा आपल्यापेक्षा वरिष्ठ खेळाडूंशी बोलण्याला तो प्राधान्य देत असतो. यात एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा उल्लेखही त्याने केला. (Yashasvi Jaiswal’s unbeaten 98 against Kolkata Knight Riders will be remembered for a long time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप क्वालिफायर्ससाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा! आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला मिळाले नाही स्थान
‘ऐतिहासिक’ कामगिरीनंतर चहलला सॅमसनने दिली नवी उपाधी, इतरांनाही केली विनंती