येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तर मुंबईचा संघ सध्या ओमान संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू यशस्वी जयस्वालने एक गगनचुंबी षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई विरुद्ध ओमान या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. टी-२० मालिकेत ओमान संघाने विजय मिळवला. तर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवून १-० ची आघाडी घेतली आहे. पहिल्या वनडे सामन्यात यशस्वीने ७९ चेंडूंमध्ये ८२ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ५ षटकार लगावले. या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने ओमान संघावर ४ गडी राखून विजय मिळवला.
या खेळी दरम्यान त्याने इतका लांब षटकार मारला की, चेंडू मैदानाबाहेर असलेल्या पार्किंगच्या ही दूर जाऊन पडला. यशस्वी जयस्वासलच्या या षटकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या शॉटचा टायमिंग आणि फटका इतका अचूक होता की, चेंडू आणि बॅटचा संपर्क होताच, चेंडू मैदानाबाहेर असलेल्या पार्किंगमध्ये जाऊन पडला.
या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, चेंडू इतका लांब गेला होता की, ओमान संघातील खेळाडू चेंडू शोधून थकले. परंतु, त्यांना चेंडू काही सापडला नाही.(Yashaswi Jaiswal cracking six against oman)
https://youtu.be/gLi5tX88WU8
जयस्वालची फटकेबाजीपाहून राजस्थान रॉयल्स संघालाही आनंद झाला असेल. कारण, लवकरच इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील दुसरा टप्पा सुरु होत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघ ६ गुणांसह ५ व्या क्रमांकावर होता. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात यशस्वी जयस्वालने ३ सामने खेळले होते, यादरम्यान त्याला ६६ धावा करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
जगात ५००० पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
क्रिकेटमध्ये संभ्रम निर्माण करणारा ‘अंपायर्स कॉल’ नेमका आहे तरी काय? वाचा सविस्तर माहिती