लेगस्पिनर यासिर शाहने पाकिस्तानच्या आशिया कप संघाला विराट कोहलीपासून दूर राहण्यास सांगितले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली काही काळापासून कठीण परिस्थितीतून जात आहे आणि तो आयसीसी टी-२० क्रमवारीत ३२व्या स्थानावर घसरला आहे. मात्र, विराट कोहलीला हलक्यात घेऊ नका, असा इशारा पाकिस्तानचा टेस्ट स्पेशालिस्ट लेग-स्पिनर यासिर शाहने आपल्याच संघाला दिला आहे.
त्याने सांगितले की, “विराट कोहलीला हलक्यात घेऊ नका. होय, तो फॉर्ममध्ये नाही, कारण तो धावा काढण्यासाठी धडपडत आहे, परंतु तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि तो कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो.” शिवाय इरफान पठाणने देखील कोहली आशिया चषकात आपली लय पुन्हा प्राप्त करेल असे भाकित वर्तवले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
हृदयद्रावक! क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू, चक्क ट्रेलरखाली चिरडला गेला देह
रसेलच्या संघाने मोडला उच्चांक! केवळ १०० चेंडूत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा