---Advertisement---

‘हे हिंदू गद्दार आहेत…’, शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त विधान; Video जोरदार व्हायरल

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 6:01 PM
---Advertisement---

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमी भारतीय संघावर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसतात. विशेष म्हणजे एमएस धोनीबद्दलही त्यांनी बर्‍याचदा टिपण्या केल्या आहेत. अशामध्ये आता योगराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळेस त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी शेतकर्‍यांमध्ये जाऊन वादग्रस्त भाषण करून स्वतःला अडचणीत आणले आहे.

योगराज यांचे आपत्तीजनक विधान

कित्येक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी एकत्रित आले आहेत. शेतकरी नवीन कृषी कायद्या विरोधात आवाज उठवत आहेत, केंद्र सरकारला हा कायदा मागे घेण्याची मागणी करतायेत. या शेतकर्‍यांना बर्‍याच दिग्गज व्यक्तींनी पाठिंबा दर्शवला आहे. यामध्येच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसून येतोय, ज्यामध्ये योगराज सिंग हिंदूंना गद्दार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.

या भाषणाला तिरस्कारी भाषण म्हटले जात आहे. कारण यामध्ये त्यांना निंदनीय, भडकावू आणि अपमानास्पद अशा भाषेचा वापर करताना पाहिले जात आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात लोक त्यांना अटक करण्याची मागणी करत आहेत, कारण त्यांचे वक्तव्य निंदनीय आहे.

ते म्हणत आहेत की, “हे हिंदू गद्दार आहेत, शंभर वर्षै मुघलांची गुलामी केली.” इतकेच नाही, तर त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे.

https://twitter.com/Atulahuja_/status/1334893793456214016

https://twitter.com/HardikDodiya_/status/1334914333969580032

कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची सात तास बैठक

सिंधू सीमेवरती एकत्रित आलेल्या शेतकर्‍यांनी 8 डिसेंबरला तीन केंद्रीय मंत्री आणि आंदोलनातील शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींचा गट यांच्या चर्चेनंतर भारत बंदची हाक देण्यात आली. एकूण पाच वेळा बैठकी पार पडल्या आहेत. मात्र त्यातून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सरकारने कथित स्वरुपात याबाबत अंतर्गत चर्चा केली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी कृषी भवनात अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. ज्यामधे 7 तास चर्चा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट

“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”

मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट

ट्रेंडिंग लेख-

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---