हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीतील पराभवाची सव्याज परतफेड करत भारतीय संघाचा एक डाव व ७६ धावांनी पराभव केला. या सामन्यावेळी मैदानात घुसलेल्या जार्वो नामक इंग्लिश प्रेक्षकावर यॉर्कशायर क्रिकेटने कारवाई केली आहे.
तिसऱ्या दिवशी मैदानात घुसला होता जार्वो
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीस येणे अपेक्षित होते. मात्र कोहलीऐवजी अचानकपणे जार्वो हा ब्रिटिश नागरिक पूर्ण तयारीनिशी मैदानात आला. त्यानंतर त्याने ‘बॅटिंग गार्ड’ देखील घ्यायला सुरुवात केली होती. ही घटना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ओढत मैदानाबाहेर नेले.
यॉर्कशायर क्रिकेटने केली कारवाई
हेडिंग्ले मैदान हे यॉर्कशायर काउंटी संघाचे घरचे मैदान आहे. तिसरा सामना संपल्यानंतर यॉर्कशायर क्रिकेटने मैदानात घुसलेल्या जार्वोवर कारवाई केल्याचे सांगितले. त्यांनी जार्वो याला आर्थिक दंड तसेच आयुष्यभर या मैदानावर न येण्याची कारवाई केली. सुरक्षा नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई केल्याचे यॉर्कशायर क्रिकेटकडून सांगितले गेले. जार्वो लॉर्डस येथील दुसऱ्या कसोटी वेळीही भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना भारताची जर्सी घालून मैदानात शिरला होता.
भारतीय संघाचा चाहता आहे जार्वो
इंग्लंडच्या रहिवासी असलेला जार्वो दुबई येथे कामानिमित्त वास्तव्यास आहे. तो स्वतःला भारतीय क्रिकेट संघाचा मोठा चाहता म्हणवतो. त्याने स्वतःसाठी भारतीय क्रिकेट संघासारखी जर्सी बनवून घेतली असून, त्यावर ‘जार्वो ६९’ असे लिहिलेले असते. जार्वो हा प्रॅन्कस्टार म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकाच्या दुष्काळातही कोहलीचा ‘विराट’ कारनामा; लीड्स कसोटीत अर्धशतकासह धोनीला पछाडलं
जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे
‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान