रिषभ पंत याच्या अपघातामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. पंत दिल्लीहून रुरकीला जात असताना वाटेत त्याचा भीषण अपघात झाला आणि त्याला गंभीर दुखापत देखील झाला. दुखापतीमुळे पंत पुढचा मोठा काळ भारतीय संघासाठी खेळणार नसल्याचेही सांगितले जात आहे. जगभरातील दिग्गज पंत लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. भारताला 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव यांनीही पंत लवकर बरा होण्याची आशा व्यक्त केली. पण यावेळी त्यांनी पंतला सुनावले देखील.
कपिल देव (Kapil Dev) यांच्या मते पंतला एवढ्या रात्री गाडी चालवण्याची गरज नव्हती. रिषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे 5.30 च्या सुरमारास अपघातग्रस्त झाला. अपघातात त्याची गाडी जळून खाक झाली, पण सुदैवाने पंत गाडी पेटण्याआधीच त्यातून बाहेर आला होता. पंतच्या पाठीला डोक्याला आणि पायांना या अपघातात गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या एका गुडख्याचे लिगामेंट फाटले असून, यातून सावरण्यासाठी त्याला 6 ते 8 महिन्यांचा वेळ लागू शकतो. अशात तो भारतीय संगासाठी आगामी काळातील काही महत्वाच्या मालिकांना मुकणार आहे. यापूर्वी कपिल देव यांचा देखील पंतप्रमाणेच बाईकवरून अपघात झाला होता.
कपिल देवचे रिषभ पंतला खडेबोल
माध्यमांशी बोलताना कपिलने त्यांच्या बाईक अपघाताची आठवण काढली. तो म्हणाले, “एकदा माझ्यासोबत देखील असा अपघात झाला होता. मला वाटते की, तुमच्याकडे एक अप्रतिम आणि वेगवान गाडी आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या सुरुक्षेच्या जबाबदारी स्वतःवर असते. अशात तुम्ही असा प्रकारे गाडी चालवण्याची गरज नाहीये. मी समजू शकतो की, कमी वयात अशा प्रकारे गाडी चालवण्याची इच्छा प्रत्येकाची असते. मात्र, स्वतःची जबाबदारी ओळखून या गोष्टी केल्या पाहिजेत. पंत नक्कीच एक ड्रायव्हर ठेवू शकत होता आणि त्याचा खर्च त्याला परवडणारा आहे.”
बीसीसीआय अधिकारी डॉक्टरांच्या संपर्कात
दरम्यान, उपघातानंतर उपस्थितांनी पंतला तत्काळ मदत केली आणि घटनास्थळी पोलीस देखील वेळेत पोहोचले. अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असली, तरीही वेळेत उपचार मिळाल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे. भारतीय संघाला यावर्षी आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये पंत संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. पण आता दुखापतीच्या कारणास्तव त्याला या दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमधून देखील माघार घ्यावी लागू शकते. पंत सध्या डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा देखील चांगल्या पद्धतीने होत आहे. बीसीसीआयचे अधिकारी आणि डॉक्टर्स त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. (‘You can certainly spend money on a driver’, Rishabh Pant was told by the former legend)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’