इंडियन प्रीमियर लीग, या टी२० लीगची ख्याती जगभरात पसरलेली आहे. आयपीएल २०२२ च्या हंगामात २ संघ नव्याने सहभागी झाल्याने या लीगला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. या हंगामाच्या यशस्वीपूर्ण हंगामानंतर एकाच वर्षात २ आयपीएल हंगाम खेळवले जाण्याच्या चर्चा होत आहेत. याच साखळीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही नाव जोडले गेले आहे. जर एकाच वर्षी आयपीएलचे २ वेगवेगळे हंगाम खेळवले गेले, तरीही त्यांना आश्चर्य होणार नसल्याचे शास्त्रींनी म्हटले आहे.
शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की, आपण सहज आयपीएलच्या २ हंगामांचे आयोजन करू शकतो. जर असे वास्तवात झाले, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. जर द्विपक्षीय क्रिकेट मालिकांची संख्या कमी झाली, तर तुमच्याकडे आयपीएलसाठी जास्तीचा वेळ शिल्लक राहिल. त्यामुळे विश्वचषकाप्रमाणे अधिकच्या बादफेरी सामन्यांसोबतही आयपीएल खेळवता येऊ शकते. १० संघासोबत खेळली जाणारी ही क्रिकेट लीग भविष्यात १२ संघांसोबतही खेळवली जाऊ शकते. १२ संघांच्या आयपीएल हंगामाचा कालावधी जवळपास दीड ते २ महिन्यांपर्यंत राहिल.”
८० कसोटी आणि १५० वनडे सामने खेळणाऱ्या भारताच्या माजी अष्टपैलू शास्त्रींचे म्हणणे आहे की, “आयपीएलचा विकास क्रिकेटसाठीही फायदेशीर ठरेल. एकाच वर्षात आयपीएलचे २ हंगाम आयोजनेही शक्य आहे. यामागचे कारण सांगताना शास्त्री म्हणाले की, आयपीएलचा विस्तार केला जाऊ शकतो. हे क्रिकेटसाठी खूप चांगले ठरेल. खेळाडू, प्रसारक आणि संघांसोबत काम करणाऱ्या लोकांसाठीही हे फायद्याचे ठरेल. आयपीएल ही स्वत स्वतमध्ये असलेली एक इंडस्ट्री आहे.”
दरम्यान एकाच वर्षी २ आयपीएल हंगाम खेळवण्याबाबत प्रतिक्रिया देणारे शास्त्री पहिलेच नाहीत. त्यांच्यापूर्वीही बऱ्याच आजी-माजी दिग्गजांनी एका वर्षात २ आयपीएल खेळवल्याने आश्चर्य वाटणार नसल्याचे म्हटले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने याबद्दल सर्वप्रथम प्रतिक्रिया नोंदवली होती. एकाच वर्षी २ आयपीएल हंगाम खेळवण्याचा बदल निश्चित होईल. परंतु यासाठी काही वर्षांचा कालावधी उलटावा लागेल, असे भाकित चोप्राने केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…
डिव्हिलियर्सला विसरायला लावणारा स्टब्स आहे तरी कोण? २८ बॉलवर उडवला ७२ धावांचा धुरळा
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”