आयर्लंड येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या युवा जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी (10 जुलै) भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली. भारताचे प्रतिनिधित्व करणारा साताऱ्याचा युवा तिरंदाज पार्थ साळुंखे याने 21 वर्षाखालील वयोगटात रिकर्व्ह प्रकारात कोरियाच्या खेळाडूला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला तिरंदाज ठरला. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासांआधी साताऱ्याची युवा महिला तिरंदाज आदिती स्वामी हिनेदेखील कंपाउंड प्रकारात विश्वविजेती होण्याचा मान मिळवला आहे.
Parth Salunkhe's PURE DETERMINATION. 👏
India has the new 2023 World Archery Youth Champion. 🇮🇳🇮🇳🇮🇳#WorldArchery pic.twitter.com/rTDPYDCDBA— World Archery (@worldarchery) July 9, 2023
लिमरिक येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पार्थ हा भारतीय संघाचा भाग होता. त्याने अनेक वरच्या मानांकित खेळाडूंना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केलेला. अंतिम फेरीत कोरियाच्या सोंग याला 7-3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे एकतर्फी पराभूत केले. रिकर्व्ह प्रकारात यापूर्वी कोणत्याही भारतीय तिरंदाजाला या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आले नव्हते. महिलांच्या रिकर्व्ह संघाने देखील याच वयोगटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली.
भारतीय पथकाने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्य पदके जिंकली. भारत स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारा देश राहिला. मात्र, कोरियन संघाने सहा सुवर्ण व चार रौप्य जिंकल्याने कोरियन संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर लागला.
(Young Archer Parth Salunkhe Won Gold Medal In Youth World Archery Championship)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध