दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच एसए20 ही टी20 लीगचा घाट घातला गेला आहे. या लीग स्पर्धेची सुरुवात 10 जानेवारीपासून झाली. या स्पर्धेतील 7वा सामना जोबर्ग सुपर किंग्स विरुद्ध एमआय केप टाऊन संघात पार पडला. या सामन्यात एमआय केप टाऊन संघाने दमदार कामगिरी करत 7 विकेट्सने विजय मिळवला. असे असले, तरीही केप टाऊनच्या डेवाल्ड ब्रेविस याने मारलेल्या नो लूक सिक्सची चर्चा सर्वत्र रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात एमआय केप टाऊन (MI Cape Town) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी जोबर्ग संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 105 धावा चोपल्या. केप टाऊन संघाने हे आव्हान 16.2 षटकातच गाठले. त्यांनी 3 विकेट्स खर्च करत 107 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. हा केप टाऊनचा स्पर्धेतील दुसरा विजय होता.
केप टाऊनच्या डावातील 8वे षटक टाकण्यासाठी जोबर्गचा ऍरॉन फंगिसो (Aaron Phangiso) गोलंदाजीला आला होता. त्याने पहिला चेंडू टाकताच त्यावर केप टाऊनचा 19 वर्षीय फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने गगनचुंबी षटकार खेचला. हा ‘नो लूक सिक्स’ (No Look Six) होता. म्हणजेच त्याने षटकार मारल्यानंतर चेंडूकडे पाहिलेदेखील नाही.
No look six by Dewald Brevis, He is a freak. pic.twitter.com/q7ZWcAWRW6
— Johns. (@CricCrazyJohns) January 14, 2023
ब्रेविसच्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या सामन्यात 34 चेंडूत सर्वाधिक 42 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 2 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊसही पाडला.
केप टाऊनचा स्पर्धेतील प्रवास
एसए20 (SA20) या पहिल्या वहिल्या स्पर्धेत एमआय केप टाऊन संघाने दमदार सुरुवात केली. त्यांनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पार्ल रॉयल्स संघाला पराभूत 8 विकेट्सने पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना डर्बन सुपर जायंट्स संघाविरुद्ध 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेतील 3 सामन्यांनंतर केप टाऊन संघ गुणतालिकेत 2 विजयांसह 9 गुण मिळवत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. (young cricketer Dewald Brevis smashes No-Look six against Joburg Super Kings in SA20 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच
कोण आहे तो भारतीय धुरंधर ज्याने उडवलीये फाफ डू प्लेसिसची रात्रीची झोप? माजी कर्णधारानेच केलाय खुलासा






