भारतीय संघाचा स्टार युवा खेळाडू पृथ्वी शॉ दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, त्याने यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. पृथ्वी इंग्लंडच्या देशांतर्गत काऊंटी क्रिकेट स्पर्धेतही खेळत होता. त्याने नॉर्थम्प्टनशायर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान पृथ्वी शॉला गुडघ्याची दुखापत झाली. अशात त्याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. त्याला क्रिकेटपासून दीर्घ काळासाठी दूर राहावे लागू शकते, असे वृत्तांमध्ये म्हटले जात आहे.
आघाडीचे वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉला तीन-चार महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर (prithvi shaw will be out for three four months from cricket) राहावे लागू शकते. तो इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायर (Northamptonshire) संघाकडून खेळत असलेल्या एका सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. पृथ्वीला ऑगस्ट महिन्यात गुडघ्याची दुखापत झाली होती. तिथे त्याने दमदार प्रदर्शन करत द्विशतक ठोकले होते.
वृत्तानुसार, बीसीसीआयने पृथ्वी शॉच्या दुखापतीची पुष्टी केली आहे. तो तीन ते चार महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहील. यादरम्यान तो रिहॅबमध्ये असेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पृथ्वी दुखापतग्रस्त झाल्यानंतर एमआरआय करण्यात आला. यामध्ये समजले की, लिगामेंटमध्ये दुखापत आहे. पृथ्वीची सर्जरी होणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतला गेला नाहीये.
Prithvi Shaw set to be ruled out for 3-4 months. (Indian Express). pic.twitter.com/eH9MwUKng3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 14, 2023
पृथ्वीची कामगिरी
विशेष म्हणजे, पृथ्वी शॉ याने नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळताना एका सामन्यात नाबाद 125 धावा केल्या होत्या. यापूर्वी त्याने 244 धावांची शानदार द्विशतकी खेळीही साकारली होती. पृथ्वी हा भारतीय संघातून 2021पासून बाहेर आहे. त्याने भारताकडून अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध जुलै 2021मध्ये खेळला होता. त्याने अखेरचा कसोटी सामना डिसेंबर, 2020 ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
पृथ्वीची कारकीर्द
भारतीय संघाकडून पृथ्वी शॉ याने एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 339 धावा निघाल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 6 वनडे सामनेही खेळले आहेत. यासोबतच एक टी20 सामनाही खेळला आहे. त्याने वनडेत 189 धावा केल्या आहेत, तर टी20त त्याला एकही धाव करता आली नाही. (young cricketer prithvi shaw will be out for three four months cricket knee injury)
हेही वाचा-
बेन स्टोक्सपुढे न्यूझीलंडच्या 11 खेळाडूंनी टेकले गुडघे, इंग्लंडचा 181 धावांनी ऐतिहासिक विजय
वर्ल्डकप 2023साठी 10 पैकी 7 संघांनी घोषित केले Squad, पाकिस्तानसह ‘या’ 3 Team अजूनही बाकी