गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी (दि. २७ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या आयपीएल २०२२च्या ४०व्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजाने उत्तुंग कामगिरी केली. सामना जरी गुजरातने जिंकला असला, तरीही हैदराबादच्या उमरान मलिकला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्काराने गौरवण्यात आले. मलिकने या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात गुजरातने (Gujarat Titans) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या. मात्र, गुजरातने हे आव्हान ५ विकेट्स गमावत शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत पूर्ण केले आणि त्यांनी विजय मिळवला. असे असले, तरीही गुजरातचे सर्व ५ विकेट्स घेण्याचा कारनामा हैदराबादच्या उमरान मलिकने (Umran Malik) केला. त्यामुळे मलिकचा समावेश एका खास यादीत झाला.
HE'S GOT 5️⃣ WICKETS. WE REPEAT. HE'S GOT 5️⃣ WICKETS. 🔥🧡#JammuExpress #GTvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/hPJhkIfeTF
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2022
गुजरातच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडत उमरान मलिक आयपीएलमध्ये एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा दुसरा सर्वात युवा गोलंदाज बनला आहे. ही कामगिरी केली, तेव्हा त्याचे वय २२ वर्षे आणि १५७ दिवस इतके होते. या यादीत पहिल्या क्रमांकावर जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आहे. त्याने २१ वर्षे आणि २०४ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आहे. अर्शदीपने २२ वर्षे आणि २२८ दिवसांच्या वयात एका आयपीएल सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या.
He may not have ended on a winning side tonight but Umran Malik put on an outstanding display to pick 5⃣ wickets and bagged the Player of the Match award. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/r0x3cGZLvS #TATAIPL #GTvSRH pic.twitter.com/AlOEPvruKx
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
आयपीएल २०२२मध्ये उमरान मलिक शानदार कामगिरी करत आहे. त्याच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १५ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा टी नटराजनसह (T Natarajan) संयुक्तरीत्या दुसरा गोलंदाज बनला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आहे. त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारे गोलंदाज
२१ वर्षे आणि २०४ दिवस- जयदेव उनाडकट
२२ वर्षे आणि १५७ दिवस- उमरान मलिक*
२२ वर्षे आणि २२८ दिवस- अर्शदीप सिंग
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचांसोबत वाद आणि राजस्थानविरुद्धचा पराभव पचवण्यासाठी लागले ‘एवढे’ दिवस, वॉटसनचा खुलासा
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा