---Advertisement---

शुबमनचे कमी वयात भारताकडून टी20त शतक, पण वनडे अन् कसोटीत शतक मारणारे युवा भारतीय कोण?

On: गुरूवार, फेब्रुवारी 2, 2023 11:56 AM
Shubman-Gill-Record
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यात भारतीय संघाने 168 धावांनी विजयदेखील मिळवला. या विजयातील सर्वात मोठे योगदान शुबमन गिल याने दिले. त्याने शतक झळकावले. विशेष म्हणजे, त्याने शतक झळकावताच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील खास विक्रम नोंदवला गेला. काय आहे तो विक्रम चला जाणून घेऊया…

शुबमन गिल याचा विक्रम
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून शुबमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी किशन 1 धावेवरच बाद झाला. मात्र, गिलने शेवटपर्यंत झुंज दिली आणि तो नाबादही राहिला. यावेळी त्याने 63 चेंडूत 7 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडत सर्वाधिक नाबाद 126 धावा कुटल्या. हे शतक करताच गिल आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारतीय संघाचा सर्वात युवा खेळाडू बनला. गिलने 23 वर्षे आणि 146 दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय टी20 शतक झळकावले. हे त्याचे टी20 क्रिकेटमधील पहिलेच शतक होते.

https://twitter.com/ICC/status/1620797917937209344

कसोटी आणि वनडेत शतक झळकावणारे युवा भारतीय
हे झाले आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचे. मात्र, कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये शतक करणारे युवा भारतीय कोण आहेत? हे आपण जाणून घेऊया… भारताकडून कमी वयात कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने अवघ्या 17 वर्षे आणि 107 दिवसांच्या वयात कसोटी शतक झळकावले होते. याव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून विनोद कांबळी याने कमी वयात शतक झळकावले होते. त्यावेळी कांबळीचे वय 21 वर्षे इतके होते.

भारताकडून कमी वयात शतक झळकावणारे खेळाडू
17 वर्षे आणि 107 दिवस- सचिन तेंडुलकर (कसोटी)
21 वर्षे- विनोद कांबळी (वनडे)
23 वर्षे आणि 146 दिवस- शुबमन गिल (आंतरराष्ट्रीय टी20)*

भारताचा शानदार विजय
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 234 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्यामुळे त्यांचा डाव 12.1 षटकात 66 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने तब्बल 168 धावांनी खिशात घातला. तसेच, मालिकाही 2-1ने नावावर केली. विशेष म्हणजे, हा भारताचा टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय होता. (Youngest Indian to score Century in test, odi and t20i)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वत:च्या जोरावर…’, हार्दिक पंड्याने सांगूनच टाकले नेतृत्वाच्या यशाचे रहस्य
भारतासाठी 2023 लकी! बलाढ्य संघांना धूळ चारत वनडे अन् टी20त रचला इतिहास, आकडेवारी वाचून वाटेल अभिमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---