भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल आपल्या मनाप्रामाणे कसोटी पदार्पण करू शकला. जयसवालने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले, जी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. पण जयसवालचे कुटुंब मात्र यादरम्यानच्या काळात एका वेगळ्या धावपळीत होते. जयस्वाल आता भारतात येईल, तेव्हा तो थेट आपल्या नव्या घरातच जाणार, हे आता निश्चित झाले आहे.
यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा 17 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या डॉमिनिका कसोटीत त्याने 171 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारताच्या विजयासाठी जयसवालची भूमिका सर्वात महत्वाची राहिली आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. अशात त्याचे कुटुंब या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर त्याच्या स्वागताच्या तयारीत आहे. मात्र, जयस्वाल जेव्हा भारतात येईल, तेव्हा आपल्या जुण्या घरात जाणार नाही. तो वेस्ट इंडीजविरुद्ध खेळत असताना त्याचे कुटुंब ठाण्यातील 5 बीएचके घरात शिफ्ट होत होते. कुटुंबातील सदस्य नव्या घरासाठी सामान खरेदी करत होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जयसवाल आधी राहत असलेले घर स्वतःचे नव्हते. तो 2 बीएचके घरात राहत होता, जे भाड्याने घेतलेले होते. मागच्या दोन वर्षांपासून जयसवाल कुटुंब या घरात राहत होते. मात्र, आता हे कुटुंब नव्या घरात शिफ्ट झाले आहे. माहितीनुसार यशस्वी जयसवाचे वडील 21 जयस्वाच्या शतकानंतर कांवड यात्रेसाठी रवाना झाले आणि फोनवरून कुटुंबाच्या संपर्कात होते. एकेकाळी पाणीपुरीचा गाडा चालवणाऱ्या यजस्वीचा हा प्रवास थक्क करणारा म्हणता येईल.
यशस्वी देखील वेस्ट इंडीजमधून सतत कुटुंबाच्या संपर्कात होता. मागच्या काही दिवसांपासून त्याने कुटुंबियांकडे नव्या घरात शिफ्ट होण्याचा आग्रह धरला होता. यशस्वीचा भाऊ तेजस्वीने याविषयी सांगितले की, तो घरच्यांना म्हणायचा लवकरात लवकर नव्या घरात शिफ्ट व्हा. कारण, त्याला नव्या घरात राहायचे आहे. कसोटी सामना सुरू असतानाही त्याने शिफ्टिंगविषयी घरच्यांकडे विचारपूस केली होती. त्याचे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न होते की, त्याचे स्वतःचे घर असावे, त्याला डोक्यावर छत असण्याचे महत्व माहीत होते. (Youngster Yashasvi Jaiswal has bought a new 5 BHK house in Thane)
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’
‘अश्विन देशाचा महान…’, भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून दिग्गजाचे खास कौतुक