मागील वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील सामान्य व्यक्तिंपासून ते सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता चहलचे आई वडील दोघेही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. ही आनंदाची बातमी चहलने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
युजवेंद्र चहलने स्वतः ही बातमी सांगितली
चहलने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत बसलेला दिसत आहे. फोटो पोस्ट करत त्याने त्याचे आई-वडील आता बरे झाले असल्याचे सांगितले आहे.
त्याने लिहिले की, ‘तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे माझ्या आई-वडीलांना बरे वाटत आहे. माझ्या मित्रांकडून, कुटुंबीयांकडून आणि आपल्या सर्वांकडून मिळालेल्या मदतीसाठी मी सर्वांचा आभारी आहे. माझे आई वडील आता ठीक आहेत. आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की, स्वतःची काळजी घ्या. सुरक्षित राहा.’
यापुर्वी युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने तिच्या सासू-सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने दु:ख व्यक्त केले होते. तिने सोशल मीडिया पोस्ट करत सांगितले होते की, ‘युजवेंद्र चहलच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची लक्षणे गंभीर आहेत. वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. आईंवर घरामध्येच उपचार चालू आहेत.’
परंतु आता युजवेंद्र चहलचे आई वडील दोघेही बरे झाले असल्याने धनश्री आनंदी आहे.
https://www.instagram.com/p/CP7lz7PMdsu/?utm_source=ig_web_button_share_sheet
2020 मध्ये चहल आणि धनश्रीचा झाला विवाह
डिसेंबर 2020 मध्ये चहल आणि धनश्री यांचे लग्न झाले होते. चहल आणि धनश्री ही क्रिकेटजगतातील लोकप्रिय जोडी आहे. चाहते यांच्या जोडीला खूप पसंद करतात. ते नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. युजवेंद्र चहलची सध्या श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निवड झाली आहे. हा संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारताच्या जावया’ची बातच न्यारी, केवळ ११ चेंडूत अर्धशतक ठोकत युएईत आणलं वादळ
WTC Final: कसोटीत नाबाद २५४ धावा चोपणाऱ्या ‘मॅक्सभाऊं’ना अडवायचं तरी कसं? विराटची चिंता शिगेला
फिरकीपटू अश्विनला ‘हा’ खतरनाक चेंडू टाकण्याची पाहिजे परवानगी, भज्जीचा होता त्यात हातखंडा